केंद्रीय मंत्री कसा झालो?; भागवत कराड यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

भाजप नेते डॉ. भागवत कराड यांना केंद्रात अर्थराज्य मंत्रीपद मिळालं आहे. कराड यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चाही नव्हती. मात्र काल अचानक त्यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आले आणि कराड चर्चेत आले. (Modi Cabinet Expansion)

केंद्रीय मंत्री कसा झालो?; भागवत कराड यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Bhagwat Karad
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 11:56 AM

नवी दिल्ली: भाजप नेते डॉ. भागवत कराड यांना केंद्रात अर्थराज्य मंत्रीपद मिळालं आहे. कराड यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चाही नव्हती. मात्र काल अचानक त्यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आले आणि कराड चर्चेत आले. आपल्याला मंत्रिपद कसं मिळालं? काल नेमकं काय घडलं यावर स्वत: भागवत कराड यांनीच प्रकाश टाकला आहे. (Bhagwat Karad told how he gets cabinet berth in modi team)

भागवत कराड यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर मीडियासोबत संवाद साधला. मी मंत्री होणार याची मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. मला कोणत्याही ऑफिसमधून फोन आला नव्हता. पण शपथविधीच्या दिवशी मला फोन आला आणि मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहा असं सांगितलं. त्यानंतर मी मोदींची भेट घेतली आणि संध्याकाळी माझा शपथविधी पार पडला, असं भागवत कराड यांनी सांगितलं.

आजपासूनच कामाला सुरुवात

माझ्याकडे अर्थराज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी आजपासूनच कामाला सुरुवात करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मी आज भेट घेणार आहे. आजपासूनच कामाला सुरुवात करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात उद्योग आणणार

मी कालच शपथ घेतली. देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत घेऊ. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये उद्योग खूप आहेत. राज्यात मोठे कारखाने कसे येतील. लोकांना काम कसे मिळेल, यावर माझा भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भागवत कराड कोण आहेत?

-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक -1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर -2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर -2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी (Bhagwat Karad told how he gets cabinet berth in modi team)

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात, भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याची चौकशी

नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, पण त्यांची उंची मोठी, आता राणेंनी उद्योगांना संजीवनी द्यावी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

भारती पवार म्हणाल्या, फडणवीसांचे आभार मानते आणि प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंना हसू आवरेना, तो व्हीडीओ पुन्हा व्हायरल

(Bhagwat Karad told how he gets cabinet berth in modi team)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.