Bharat Bandh Today Live : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’, दिल्ली गाजीपूर रस्त्यावर चक्काजाम, 32 ठिकाणाच्या रेल्वे रुळावर ठाण, रेल्वे सेवेवर परिणाम

| Updated on: Mar 31, 2021 | 6:36 AM

संयुक्त किसान मोर्चाने 'भारत बंद'चं आवाहन केलं आहे. (Farmers Bharat Bandh Today Live)

Bharat Bandh Today Live : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा 'भारत बंद', दिल्ली गाजीपूर रस्त्यावर चक्काजाम, 32 ठिकाणाच्या रेल्वे रुळावर ठाण, रेल्वे सेवेवर परिणाम
Farmers-Bharat-Bandh-today

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. या आवाहनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. यादरम्यान दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी देण्यात आली आहे. (Bharat Bandh Today Live)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Mar 2021 11:42 AM (IST)

    अमृतसरच्या रेल्वे रुळावर शेतकऱ्यांनी ठाण मांडलं

  • 26 Mar 2021 11:07 AM (IST)

    4 मेट्रो स्टेशन बंद – DMRC

    शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टिकरी बॉर्डर, पंडित श्री राम शर्मा, बहादुरग़ सिटी आणि ब्रिगेडिअर होशियार सिंह मेट्रो स्टेशनचे एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद असल्याची माहिती, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे.

  • 26 Mar 2021 10:16 AM (IST)

    भारत बंदने सरकारला संदेश जाईल- शेतकरी नेते राजवीर सिंह

    कृषी कायद्याविरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता जवळपास चार महिने पूर्ण झालेत. भारत बंदमध्ये अनेक लोकांचा , व्यापाऱ्यांचा, संस्थांचा आम्हाला सहकार्य मिळतंय. यामुळे सरकारला एक संदेश जाईल. सरकारशी संवाद साधण्याकरिता आम्ही 24 तास तयार आहोत, असं शेतकरी नेते राजवीर सिंह म्हणाले.

  • 26 Mar 2021 09:34 AM (IST)

    गाझीपूर बॉर्डरवर गाणी म्हणत शेतकऱ्यांना पाठिंबा

  • 26 Mar 2021 09:28 AM (IST)

    मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला अटक

    मुंबई –

    एनसीबीची मोठी कारवाई

    मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला अटक

    काल रात्री केली अटक

    दोन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त

    लोखंडवाला , वर्सोवा आणि मीरा रोड येथे एनसीबीची कारवाई

  • 26 Mar 2021 09:03 AM (IST)

    पंजाबच्या लांबी गावात होणार चक्का जाम

    panjab lambi Villlage bharat bandh

    panjab lambi Villlage bharat bandh

  • 26 Mar 2021 09:01 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

    पुणे –

    – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर,

    – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय,

    – तसेच २५ एप्रिल रोजी विद्यापीठातर्फे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल,

    – त्यानुसार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ११ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे,

    – शारीरिक शिक्षण पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ११ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत,

    – विधी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते १७ एप्रिल दरम्यान,

    – शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षा १० ते २० एप्रिल

    – जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयांच्या परीक्षा १० ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणार आहेत

  • 26 Mar 2021 08:58 AM (IST)

    सत्याग्रह से ही अत्याचार, राहुल गांधींचं ट्विट

  • 26 Mar 2021 08:22 AM (IST)

    गाजीपूर सीमेवर शेतकरी रस्त्यावर

    आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गाजीपूर सीमा बंद, शेतकरी रस्त्यावर उतरले

  • 26 Mar 2021 08:18 AM (IST)

    दिल्ली- उत्तर प्रदेश NH -24 हायवे बंद

    शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते गाझियाबाद दरम्यानचा रस्ता बंद, गाझीपूर (दिल्ली-उत्तर प्रदेश) सीमेवर एनएच -24 दोन्ही बाजूंनी बंद

Published On - Mar 26,2021 11:42 AM

Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.