AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Bandh Today | शेतकऱ्यांचा एल्गार, भारत बंदची हाक, राजधानी दिल्ली जाम

Bharat Bandh Today | शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बोलणी फिस्कटल्याचा परिणाम आज राजधानी दिल्ली परिसरात दिसून आला. शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली. त्याला ट्रक आणि ट्रेड युनियनने जाहीर पाठिंबा दिल्याने दिल्लीची दमकोंडी झाली. तर शेतकऱ्यांच्या आंदोलनला खासगी बस सेवेने पण पाठिंबा दिल्याने परिस्थिती चिघळली आहे.

Bharat Bandh Today | शेतकऱ्यांचा एल्गार, भारत बंदची हाक, राजधानी दिल्ली जाम
| Updated on: Feb 16, 2024 | 10:24 AM
Share

नवी दिल्ली | 16 February 2024 : देशाची राजधानी दिल्लीसह इतर भागातही भारत बंदचा परिणाम दिसू लागला आहे. सरकारशी बोलणी फिस्कटल्यानंतर भारत बंदचा आवाज बुलंद झाला. शेतकरी सकाळपासूनच आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता व्यापक पाठिंबा मिळत आहे. ट्रक आणि ट्रेड युनियने या आंदोलनात उडी घेतली आहे. त्यामुळे दिल्लीची दमकोंडी झाली आहे. तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खासगी बस संघटनांनी पण पाठिंबा जाहीर केला आहे. पंजाब, हरियाणा आणि इतर भागातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहे. त्यांना पोलीस, निम लष्करी जवानांनी शंभू बॉर्डरवर थोपविले आहे. तर या सर्व घटनांचे देशभरात पडसाद उमटत आहे. दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय सुरु असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. लवकरच याप्रकरणात शिवसेना भूमिका घेणार आहे.

किमान हमीभावासाठी शेतकरी आक्रमक

किमान हमीभावासाठी (MSP) आणि इतर कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले होते. तीन शेतकरी कायदे, हिताचे नसल्याचे सांगत त्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर हे तीनही कायदे केंद्राने मागे घेतले होते. शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

बँकांवर परिणाम

शहरी आणि ग्रामीण भागातील बँकांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेचे कामकाज आज सुरु राहणार आहे. ज्या भागात आंदोलन तीव्र आहे, त्या भागात चक्काजाममुळे बँकेत पोहचण्याची ग्राहकांना कसरत करावी लागणार आहे. देशभरातील बँका सुरु राहणार आहेत.

ग्रामीण भागात परिणाम

ज्या भागात शेतकरी संघटनांचा प्रभाव आहे, अशा सर्व भागात या बंदचा मोठा परिणाम दिसून येईल. ग्रामीण भागात या बंदचा परिणाम दिसून येत आहे. पंजाब, हरियाणाच नाही तर ज्या ठिकाणी विविध शेतकरी संघटना सक्रीय आहेत. तिथे या बंदचा तात्काळ परिणाम दिसून आला. या ठिकाणी सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

दिल्लीच्या सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

शेतकरी संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरुप आले आहे. दिल्लीच्या सीमेवर अभूतपूर्व गोंधळाची स्थिती आहे. भारत बंदच्या हाकेनंतर गाजीपूर बॉर्डरवर कित्येक किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कार, ऑटो, टॅक्सी, बाईक यांचा वेग मंदावला आहे.

भाजीपाला, इतर मालाच्या वाहतुकीवर परिणाम

दिल्लीचा अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर पुरवठ्यावर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. आज सकाळी 6 वाजेपासून या बंदचा परिणाम दिसून आला. त्यामुळे ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणारी वाहनं रस्त्यातच थांबली आहे.

आता जुमला चालणार नाही

शेत मालाला हमीभाव, एमएसपी हा केवळ पंजाब, हरियाणाचा विषय नाही. पंजाबचे शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी लढत आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. मोदी यांनी यापूर्वी 2014 मध्ये शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या बाजून होते. पण गेल्या दहा वर्षात काय झाले. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला पण त्यांचा अहवाल लागू करण्यात आला नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. आता मोदींचा जुमला चालणार नाही, असा दावा त्यांनी केला.

अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.