Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 हजाराच्या पगारात कोट्यवधी जमवणाऱ्या इंजिनिअरवर जनार्दन ‘कृपा’, सरकारने केली मोठी कारवाई

hema meena : मध्य प्रदेशात लोकायुक्तांनी केलेल्या कारवाईनंतर हेमा मीना चर्चेत आली आहे. फक्त तीस हजार पगार असताना तिने सात कोटींची संपत्ती जमवली होती. या प्रकरणात इंजिनिअर जनार्दन सिंह याचे नाव समोर आले आहे. सरकारने त्याच्यावर कारवाई केली.

30 हजाराच्या पगारात कोट्यवधी जमवणाऱ्या इंजिनिअरवर जनार्दन 'कृपा', सरकारने केली मोठी कारवाई
Hema Meena
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 12:21 PM

भोपाळ : मध्यप्रदेशातील हॉसिंग कॉर्पोरेशनच्या सहायक इंजीनिअर हेमा मीनाच्या घरी लोकायुक्तांनी (lokayukta raid) काही दिवसांपूर्वीच छापेमारी केली होती. या छापेमारीत संपत्तीचे मोठे घबाड सापडले. अवघ्या 30 हजार रुपये पगार असतानाही हेमा मीना हिने कोट्यवधीची संपत्ती जमवली. आता तिने ही संपत्ती कशी जमवली? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. मग या प्रकरणात तिचे वरिष्ठ असलेले इंजिनिअर जनार्दन सिंह याचे नाव समोर आले आहे. जनार्दनच्या कृपेमुळे ही संपत्ती जमा झाली असल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश अन् कारवाई

हेमा मीना प्रकरणात जनार्दन सिंह याचे नाव समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांचे आदेश आल्यानंतर जनार्दनसिंहवर निलंबनाची कारवाई झाली आहे. हेमा मीना जनार्दन याच्यासोबत काम करत होत्या. परंतु जनार्दन यांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले नाही. यामुळे खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत जनार्दन सिंह याला निलंबित केले आहे.

हे सुद्धा वाचा

होय नाते होते- जनार्दन

जनार्दनसिंह यांनी हेमा मीनाशी आपले नाते होते, हे माध्यमांसमोर बोलताना मान्य केले. माझे तिच्याशी कौटुंबिक नाते असल्यामुळे सतत तिच्या घरी जाणे येणे होते. जनार्दन सिंह यांनी ठेकेदार असलेल्या अमर पंडित यांना हेमा मीनाच्या तीन प्रॉपर्टीवर काम करायला लावले. याबाबत अमर पंडित म्हणतात, जनार्दन रोज फोन आणि व्हॉट्सअॅपवर अपडेट घेत होते. मी केलेल्या कामाचे ५३ लाख रुपये त्यांनी दिले नाहीत. या संदर्भात जनार्दन आणि हेमा यांच्या नावाने डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. पण कारवाई फक्त हेमा मीना यांच्यांवर झाली. लोकायुक्तांकडे आलेल्या तक्रारींमध्ये जनार्दनच्या नावाचाही उल्लेख होता, पण आजतागायत ते तपासाच्या कक्षेत आलेले नाहीत.

लिव्ह-इनमध्ये होती हेमा

हेमा पूर्वी शंभू नावाच्या पेट्री कॉन्ट्रॅक्टरसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. 2015-16 मध्ये शंभू आणि हेमाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. जनार्दनमुळेच आपले नाते तुटल्याचा आरोप शंभूने केला होता. जनार्दन फार्म हाऊसवर नियमित येत असल्याचे सांगण्यात येते.

हेमा मीना यांचा बंगला आलिशान वस्तूंनी भरलेला होता. ३० हजार रुपये मासिक पगार घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्याच्या खोलीतून ३० लाख रुपयांचा टीव्ही संच जप्त करण्यात आला आहे. हा नवीनच आणला होता. तो सुरु केला नव्हता. फक्त बॉक्समध्ये पॅक होता. तसेच तिच्या बंगल्यात 2 ट्रक, 1 टँकर, महिंद्रा थार अशी 10 महागडी वाहनेही सापडली आहेत.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.