पोलिसातला देवमाणूस! तीन दिवसांच्या उपाशी वृद्धेला जीवनदान, भोपाळ पोलिसांची कामगिरी
भोपाळ : जगात माणुसकीपेक्षा मोठा कुठलाही धर्म नाही, असं म्हणतात (Bhopal Police Save 70 Year Old Lady). मध्य प्रदेश पोलिसांनी या माणुसकीच्या धर्माचं दर्शन घडवणारं एक प्रेरणादायी कार्य केलं आहे. यामुळे मध्य प्रदेश पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. माहितीनुसार, एक वृद्ध महिला गेल्या तीन दिवसांपासून आपल्याच घरात उपाशी होती. पण, भोपाळ पोलिसांनी तिला जीवनदान […]
भोपाळ : जगात माणुसकीपेक्षा मोठा कुठलाही धर्म नाही, असं म्हणतात (Bhopal Police Save 70 Year Old Lady). मध्य प्रदेश पोलिसांनी या माणुसकीच्या धर्माचं दर्शन घडवणारं एक प्रेरणादायी कार्य केलं आहे. यामुळे मध्य प्रदेश पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. माहितीनुसार, एक वृद्ध महिला गेल्या तीन दिवसांपासून आपल्याच घरात उपाशी होती. पण, भोपाळ पोलिसांनी तिला जीवनदान देत माणुसकीचं एक स्त्युत्य उदाहरण दर्शवलं आहे (Bhopal Police Save 70 Year Old Lady).
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 70 वर्षांची एक वृद्ध महिला चंद्रप्रभा या एकट्या भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांची देखभाल करण्यासाठी कुणीही नाही. कोरोना काळात कुणीही त्यांची मदत केली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पोटाची भूक भागवण्यासाठी काहीही उरले नाही. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून ही वृद्ध महिला उपाशी होती.
तीन दिवसांनंतर भोपाळ पोलिसांना माहिती मिळाली की उपाशी राहिल्याने एका वृद्ध महिलेची तब्येत बिघडली. सूचना मिळताच पोलिसांचं एक पथक त्यांच्या घरी पोहोचली आणि याची माहिती चाईल्ड लाईनच्या टीम मेंबरला कळवण्यात आली. सर्वजण या महिलेच्या घरी पोहोचले.
चाईल्ड लाईनच्या सदस्या मोहसिन खेन या देखील पोहोचल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलीस आणि त्या या महिलेच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. कारण, ती गेल्या तीन दिवसांपासून उपाशी होती. त्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक उमेश चौहान यांनी तात्काळ याची माहिती 108 क्रमांकावर दिली. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
‘भोपाळ पोलिसांनी महिलेला जीवनदान दिलं’
आधी महिलेवर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तिला पोटभर जेवण देण्यात आलं. जेव्हा महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली तेव्हा तिला वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं. चंद्रप्रभा यांनी सांगितलं की, त्यांची तब्येत इतकी खराब होती की त्या जेवणंही बनवू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या अशक्त झाल्या होत्या. त्यांची देखभालकरण्यासाठी कुणीही नव्हतं. त्या मुळच्या महाराष्ट्राच्या आहेत.
सध्या या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात शिफ्ट करण्यात आलं आहे. पोलिसांनी या महिलेला जीवनदान दिल्याने भोपाळ पोलिसांचं खूप कौतुक करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांची धावपळ फळाला, अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला कंबरेभर पाण्यातून वाचवलं https://t.co/rjSdR4lvnf @MumbaiPolice | #MumbaiPolice | #AksaBeach | #SuicideAttempt
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2021
Bhopal Police Save 70 Year Old Lady
संबंधित बातम्या :
नागपुरात पोलिस अधिकाऱ्याकडून गर्भवती विन्नीचे डोहाळे जेवण
पोलीस नव्हे ते देवदूत! नाशकात गर्भवती महिलेसाठी अर्ध्यारात्री पोलीस धावून आले आणि दोन्ही जीव वाचले