Pahalgam Terror Attack: हल्ल्याच्या 2 तासांनंतर काश्मीरच्या मशिदींमधून मोठी घोषणा, पाकिस्तानपर्यंत पोहोचेल आवाज
Pahalgam Terror Attack: दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि..., काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला, हल्ल्याच्या 2 तासांनंतर मशिदींमधून मोठी घोषणा..., सर्वत्र तणावग्रस्त वातावरण

Pahalgam Terror Attack: मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. हल्ल्यानंतर अनेक मुद्दे समोर येत आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या पहलगाममध्ये तणावग्रस्त परिस्थिती आहे. दरम्यान, काश्मीरच्या मशिदींमधून घोषणा देण्यात आल्याची माहिती देखील समोर येता आहे.
काश्मीरच्या मशिदींमधून दहशवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. अशा लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन देखील सरकारला करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये झालेल्या बदलांमुळे कश्मिरी नागरिकांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे समर्थक दिसत नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर तिथल्या लोकांनी कँडल मार्च काढला तक अनेक ठिकाणी बंद पुकारण्याचा आला आहे. त्याचे पडसाद निश्चितच पाकिस्तानपर्यंत पोहोचतील.
हल्ल्याच्या दोन तासांनंतर, काश्मीरच्या मशिदींमधून एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. पहलगाम हल्ला इस्लाम आणि मानवतेच्या विरोधात असल्याचे म्हटलं गेलं. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि हा हल्ला काश्मीरची शांतता आणि एकता नष्ट करण्याचा कट आहे.
काश्मीर हे आमचं घर आहे आणि आम्ही ते दहशतवाद्यांच्या हाती जाऊ देणार नाही… अशी देखीर घोषणा काश्मीरच्या मशिदींमध्ये करण्यात आली . काश्मीरच्या धार्मगुरुंनी सरकारकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, असे भ्याड हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी…
किश्तवाडमधील मशिदीतून करण्यात आलेली घोषणा
किश्तवाडमधील मशिदीतून सांगण्यात आलं की, पहलगाममध्ये घडलेली घटना हृदयद्रावक आहे. हल्ल्यात अनेक निष्पापांचे जीव गेले, दहशतवादाच्या नावाखाली लोक मारले गेले, संपूर्ण इस्लामी समुदाय याचा तीव्र निषेध करतो आणि सरकारकडून चौकशीची मागणी करतो. जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी किश्तवाड बंद राहिल…
लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या आणि काढला कँडल मार्च
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात स्थानिक लोकांनी कँडल मार्च काढून निषेध केला. दरम्यान, श्रीनगरमध्ये स्थानिक लोकांनी मेणबत्त्या पेटवून निषेध केला. काश्मीरचा लाल चौक, जो पूर्वी गर्दीने गजबजलेला असायचा, तो हल्ल्यानंतर रिकामा दिसत होता.
VIDEO | J&K: Locals of Pahalgam hold candle march for terror attack victims demanding justice.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/F19rAK7tFf
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2025
मंगळवारी झालेल्या हल्ल्यात अनेकांना अपले प्राण गमवावे लागले आहेत. अनंतनाग, पहलगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, पुलवामा, बडगाम, शोपियान, श्रीनगर येथे मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला.