AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवदीप लांडेंच्या मनाचा मोठेपणा, वॉचमनच्या हस्ते पोलीस इमारतीचं उद्घाटन, वॉचमनचे डोळे पाणावले, सर्वच स्तरातून कौतुक

Shivdeep Lande : जेव्हा शिवदीप यांनी उद्घाटन करायला सांगितलं तेव्हा या वॉचमनच्या डोळ्यात पाणी आलं. शिवदीप लांडे यांच्या या निर्णयाचं सर्वत्र सर्वत्र कौतुक होतंय.

शिवदीप लांडेंच्या मनाचा मोठेपणा, वॉचमनच्या हस्ते पोलीस इमारतीचं उद्घाटन, वॉचमनचे डोळे पाणावले, सर्वच स्तरातून कौतुक
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 4:03 PM

मुंबई : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) हे त्यांच्या वर्दीतल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक किस्से आपण वाचले, ऐकले आहेत. आताही असाच एक प्रसंग समोर आला आहे. नुकतंच डीआयजी शिवदीप लांडे यांच्या हस्ते सहरसा इथल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन (Inauguration) केलं.पण या प्रसंगी शिवदीप यांनी जे केलं त्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवदीप यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन ठेवण्यात आलं होतं. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वॉचमनच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय शिवदीप लांडे यांनी घेतला. महिला कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि वॉचमन कबीर आलम यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. शिवदीप यांनी जेव्हा या दोघांना उद्घाटन करण्यास सांगितलं तेव्हा या दोघांसह उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

शिवदीप लांडे यांच्या मनाचा मोठेपणा

डीआयजी शिवदीप लांडे यांच्या हस्ते सहरसा इथल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन केलं.पण या प्रसंगी शिवदीप यांनी जे केलं त्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवदीप यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन ठेवण्यात आलं होतं. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वॉचमनच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय शिवदीप लांडे यांनी घेतला. महिला कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि वॉचमन कबीर आलम यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. शिवदीप यांनी जेव्हा या दोघांना उद्घाटन करण्यास सांगितलं. त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून या दोघांसह उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

कौतुकाचा वर्षाव

जेव्हा शिवदीप यांनी उद्घाटन करायला सांगितलं तेव्हा या वॉचमनच्या डोळ्यात पाणी आलं. शिवदीप लांडे यांच्या या निर्णयाचं सर्वत्र सर्वत्र कौतुक होतंय. त्यांच्या कृतीने समाजात एक चांगला संदेश जात असल्याचं म्हटलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

शिवदीप लांडे कोण आहेत?

बिहार केडरमधून शिवदीप लांडे डिसेंबर 2016 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोथी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. साडे तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले. अमंली पदार्थ विरोधी पथकातील कामगिरीच्या जोरावर शिवदीप लांडे यांना एटीएसची जबाबदारी देण्यात आली होती. एटीएसमध्येही शिवदीप लांडे यांनी चांगली कामगिरी केली होती. युरेनियमचा साठा पकडणे, असो की मनसुख हिरेन ह्त्या प्रकरणाचा छडा लावण्याचं काम शिवदीप लांडे यांच्या टीमनं केलं होतं. मनसूख हिरेन प्रकरणही शिवदीप लांडे यांनीच उघड केलं आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.