Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झटका बसण्याची शक्यता आहे (Bihar Vidhansabha Election Exit Poll Results).

Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 7:39 PM

पाटणा : बिहार विधानभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज (शनिवार 7 नोव्हेंबर) पार पडलं. तीन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल येत्या मंगळवारी (10 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झटका बसण्याची शक्यता आहे. ‘Tv9 च्या महाएक्झिट पोल’नुसार बिहारच्या नागरिकांनी यावेळी मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे (Bihar Vidhansabha Election Exit Poll Results).

पहिल्या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांना जास्त पसंती

नीतीश कुमार- 38 टक्के तेजस्वी यादव- 35 टक्के सुशील मोदी- 06 टक्के चिराग पासवान- 15 टक्के गिरिराज सिंह- 06 टक्के

दुसऱ्या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना जास्त पसंती

नितीश कुमार- 31 टक्के तेजस्वी यादव- 38 टक्के सुशील मोदी- 05 टक्के चिराग पासवान- 19 टक्के गिरिराज सिंह- 07 टक्के

तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना जास्त पसंती

नीतीश कुमार- 27 टक्के तेजस्वी यादव- 43 टक्के सुशील मोदी- 04 टक्के चिराग पासवान- 15 टक्के गिरिराज सिंह- 11 टक्के

गेल्या 15 वर्षांपासून नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक भाजपप्रणित एनडीएच्या अपेक्षेपेक्षा चुरशीची ठरली (Bihar Vidhansabha Election Exit Poll Results).

विधासभेच्या एकूण 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमतासाठी 122 ही मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळणे अवघड मानले जाते. भाजप्रणित एनडीएमध्ये जनता दल युनायटेड (जदयू), मुकेश साहनी यांचा व्हीआयपी पक्ष, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षांचा समावेश आहे. तर महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे.

लोजपचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला कोणताही विरोध नाही. मी त्यांचा हनुमान आहे, अशी भूमिका चिराग पासवान यांनी घेतली होती. त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीने केवळ संयुक्त जनता दलाविरोधात उमेदवार उभे केले आहेत. नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यातील लढाईचा फायदा महागठबंधनला मिळण्याची शक्यता आहे.

Tv9 महाएक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125

लोजप – 3 ते 5

अन्य – 10 ते 15

टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 116

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120

लोजप – 1

अन्य – 6

 Tv9 महा Exit PollABP News- Cvoterआज तक - अ‍ॅक्सिस माय इंडियारिपब्लिक भारत-जन की बातटाइम्स नाऊ-Cvoter
भाजप + जदयू - एनडीए110 ते 120104 ते 12891 ते 117116
राजद + काँग्रेस - महागठबंधन115 ते 125108 ते131136 ते 138120
लोजप3 ते 501
अन्य10 ते 1506

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

राजद – 80 काँग्रेस – 27 जदयू – 71 भाजप – 53 लोजप – 2 रालोसप – 2 हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1 एकूण जागा – 243

(Bihar Vidhansabha Election Exit Poll Results Live Update)

मतदानाची टक्केवारी

पहिला टप्पा – 53.54 टक्के दुसरा टप्पा – 53 टक्के तिसरा टप्पा – 55.22 टक्के

कोणाच्या किती रॅली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12 मुख्यमंत्री नितीश कुमार- 100 तेजस्वी यादव- 251 चिराग पासवान- 103 राहुल गांधी- 8 असदुद्दीन ओवैसी- 100

संबंधित बातमी : Bihar Election Exit Poll Live : NDA ला फटका बसण्याची चिन्हं, महागठबंधन झेप घेण्याचे संकेत, ‘TV9 महाएक्झिट पोल’चे अंदाज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.