Bipin Rawat Funeral : बिपीन रावत यांचं पार्थिव सायंकाळपर्यंत विशेष विमानानं दिल्लीत आणणार, उद्या दुपारी अंत्यसंस्कार

Bipin Rawat Funeral: देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं.

Bipin Rawat Funeral : बिपीन रावत यांचं पार्थिव सायंकाळपर्यंत विशेष विमानानं दिल्लीत आणणार, उद्या दुपारी अंत्यसंस्कार
बिपीन रावत
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 6:39 AM

Bipin Rawat Funeral : नवी दिल्ली: देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला (Delhi) आणलं जाणार आहे. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. दोघांवर दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे बिपीन रावत यांचं मूळ राज्य असणाऱ्या उत्तराखंडमध्ये राज्य सरकारनं तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

बिपीन रावत यांचं पार्थिव विमानानं दिल्लीला आणणार

सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणलं जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रावत यांची छोटी बहीण आणि भाऊ उपस्थित राहणार आहेत. जनरल रावत यांना दोन मुली आहेत.

उत्तराखंडमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.रावत यांच्या निधनानं दु: ख झाल्याचं पुष्कर सिंह धामी म्हणाले. रावत यांनी देशासाठी जीवन समर्पित केल्याचं धामी म्हणाले. बिपीन रावत यांचा जन्म उत्तराखंड येथील पौडी गढवालमध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबाला सैन्य दलातील सेवेचा वारसा देखील आहे. बिपीन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह रावत लेफ्टनंट जनरल होते.

नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन मिनिटे मौन पाळत त्यांना आदरांजली दिली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते.

इतर बातम्या:

‘त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं’, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली

CDS Bipin Rawat Death News: … आणि देशाचा श्वास थांबला; हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

CDS Bipin Rawat Death News and Updates: लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू

Bipin Rawat Funeral cds Bipin Rawat and his wife death body will brought to New Delhi from Tamil Nadu today plan to last rites on Friday

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.