शरद पवार यांनी काँग्रेसला बसखाली ढकललं… उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींना मोठी चपराक , भाजपचा हल्लाबोल

गौतम अदानी प्रकरणावरून शरद पवार यांनी घेतलेली भूमिका आज देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप नेत्यांनी आता यावरून काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

शरद पवार यांनी काँग्रेसला बसखाली ढकललं... उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींना मोठी चपराक , भाजपचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 10:44 AM

नवी दिल्ली: शरद पवार (Sharad Pawar) यांनी गौतम अदानी प्रकरणावरून काँग्रेसविरोधी (Congress) भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केलाय. एका भाजप नेत्याने तर शरद पवार यांनी काँग्रेसला बसखाली ढकललं, अशाच शब्दात खोचक टीका केली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांचं हे ट्विट सध्या जोरदार चर्चा आहे. गौतम अदानी प्रकरणावरून शरद पवार यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे काँग्रेससह विरोधी पक्षांना धक्का बसला असून भाजपने हीच संधी साधली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेवरून आधी उद्धव ठाकरे यांनी चपराक लगावली तर आता गौतम अदानींवरून शरद पवार यांनी अंग काढून घेतलं, अशी टीका भाजपकडून होताना दिसतेय.

अमित मालवीय यांचं ट्विट काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गौतम अदानी यांना उगाच टार्गेट केलं जातंय, असं वक्तव्य केलंय. त्यावरून अमित मालवीय यांनी लिहिलंय- शरद पवार यांनी काँग्रेसला बसखाली ढकललं आहे. सुप्रीम कोर्टाने अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची घोषणा केल्यानंतर जेपीसीची मागणी अप्रासंगिक आहे, असं पवार म्हणालेत. राहुल गांधी यांच्या वेडसरक कल्पनांमुळे काँग्रेस मित्रपक्ष पुन्हा सपशेल फोल ठरले. वीर सावरकरांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी चपराक लगावल्यानंतर ही सलग दुसरी वेळ आहे, अशी टीका मालवीय यांनी ट्विटद्वारे केली आहे..

शरद पवार यांची त्वरित पत्रकार परिषद

शुक्रवारी एका शरद पवार यांनी गौतम अदानी प्रकरणावरून एका मुलाखतीत वेगळी भूमिका मांडली. यावरून संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. काँग्रेस यामुळे तोंडावर आपटल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज शनिवारी शरद पवार यांनी याच विषयावरून तडकाफडकी पत्रकार परिषद घेतली. जेपीसी म्हणजे जॉइंट पार्लेंट्री कमिटी. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य यात असतात. ज्यांची सभासद संख्या जास्त आहे, त्यांना या समितीत जास्त जागा मिळातात. उदा. २१ लोकांची जेपीसी असेल तर त्यात १५ सदस्य भाजपचे, सत्ताधारी पक्षाचे असतील. त्यामुळे याची जेपीसीद्वारे चौकशी केल्यास त्यात शंकेला वाव आहे, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलंय. मी जेपीसीला सरसकट विरोध करत नाही. पण पारदर्शकतेची शाश्वती नाही. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती योग्य आहे, असं मला वाटतं, असं शरद पवार म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.