केवळ यूपीमध्येच नाही तर ‘या’ राज्यांमध्येही भाजपने जाट नेत्यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं; हा निव्वळ योगायोग नाही

भाजपम पक्षाचे उच्चपदस्थ नेते केवळ नियोजनाअंती असे निर्णय घेतात आणि याकडे निव्वळ योगायोग पाहतात असं नाही तर तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहिले जातं असं भाजपमधील ज्येष्ठ नेते सांगतात.

केवळ यूपीमध्येच नाही तर 'या' राज्यांमध्येही भाजपने जाट नेत्यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं; हा निव्वळ योगायोग नाही
Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 5:59 AM

नवी दिल्लीः भूपेंद्र सिंह चौधरी (Bhupendra Singh Chowdhary) यांना उत्तर प्रदेशचे भाजप पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चौधरी हे जाट समाजातील भाजपचे तिसरे प्रदेशाध्यक्ष (state president) ठरले आहेत. भूपेंद्र सिंह यांच्याशिवाय, हरियाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष ओ. पी. धनकर आणि राजस्थानमधील भाजपचे सतीश पुनिया हे देखील जाट समुदायाचे नेते म्हणूनच भाजप अध्यक्ष बनले आहेत. विशेष म्हणजे जाट अध्यक्ष असलेल्या या तिन्ही राज्यांच्या सीमा एकमेकांशी लागून राहिल्या आहेत. उत्तर प्रदेशची सीमा हरियाणा आणि राजस्थान या दोन्ही राज्यांना लागून आहे, तर राजस्थान आणि हरियाणाची सीमादेखील एकमेकांना लागली आहे. म्हणजेच दिल्लीच्या आसपास पसरलेल्या सर्व राज्यांमध्ये भाजपने जाट समाजातील प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती (Appointment of regional presidents of Jat community) करण्यात आली आहे. एवढेच नाही तर नुकतेच देशाचे उपराष्ट्रपती निवडून आलेले जगदीप धनकर हेदेखील याच समाजातून आले आहेत. राजस्थानच्या जाट समाजातून आलेल्या धनकर यांना शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे सांगून भाजपकडून त्यांचा जोरदारपणे प्रचार करण्यात आला.

राजस्थानमध्ये 12 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 6 टक्के

मतांच्या बाबतीत, हरियाणातील प्रभावशाली गट म्हणून जाट समुदायाची मतदार लोकसंख्या 27 टक्के आहे. राजस्थानमध्ये 12 टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 6 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या शेतकरी आंदोलनादरम्यान, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या जाट समाजातील सर्व प्रमुख नेत्यांची, विशेषत: सर्व खासदार/आमदारांची, केंद्र सरकार करत असलेल्या कामांबद्दल एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे.

जाटबहुल भागात भाजपची कामगिरी चांगली

जाट शेतकऱ्यांचा शेतकरी आंदोलनाकडे असलेला कलही आता कमी झाला आहे आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही पश्चिम उत्तर प्रदेशातील जाटबहुल भागात भाजपची कामगिरी चांगली राहिली असल्याचे सांगितले जात आहे. यूपी भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनीही दावा केला आहे की, गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाचा स्ट्राइक रेट संपूर्ण राज्यात अव्वल होता आणि आम्ही आगामी काळातही तशीच अपेक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही सर्वोत्तम निकाल असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाट नेत्याला प्रदेशाध्यक्ष बनवणे हा निव्वळ योगायोग नाही

पक्षाचे उच्चपदस्थ नेते केवळ नियोजनाअंती असे निर्णय घेतात आणि याकडे निव्वळ योगायोग म्हणून न पाहता प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे असं भाजपच्या जाणकारांचे मत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी यूपीसारख्या गुंतागुंतीचे जातीय राजकारण असलेल्या राज्यात प्रथमच अशा जाट नेत्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवणे ही सामान्य गोष्ट नाही. मात्र, एक नेता म्हणून भूपिंदरसिंग चौधरी यांची एक उत्कृष्ट समन्वयक आणि कोणत्याही वादात न पडता तळागाळातील कार्यकर्त्याप्रमाणे काम करणारा कामगार समर्थक नेता म्हणूनही अशी प्रतिमा आहे. चौधरी यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे, जिथे अलीकडेच नियुक्त केलेले संघटना मंत्री धरमपाल सिंग सैनी आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंग चौधरी हे दोघेही पश्चिम विभागातून आणि ओबीसी प्रवर्गातून नियुक्त करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या दोघांची पार्श्वभूमी ही संघटना कौशल्यावर आधारित आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.