राणेंच्या अटकेवर भाजप हायकमांडची पहिली प्रतिक्रिया, ना हम डरेंगे, ना दबेंगे!

| Updated on: Aug 24, 2021 | 5:41 PM

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही पडसाद उमटले आहेत. (bjp leader jp nadda first reaction on Narayan Rane's arrested)

राणेंच्या अटकेवर भाजप हायकमांडची पहिली प्रतिक्रिया, ना हम डरेंगे, ना दबेंगे!
narayan rane
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही पडसाद उमटले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या अटकेचा निषेध नोंदवला आहे. ना हम डरेंगे, ना दबेंगे, असा इशारा जेपी नड्डा यांनी दिला आहे. (bjp leader jp nadda first reaction on Narayan Rane’s arrested)

जेपी नड्डा यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक ही संवैधानिक मूल्यांचं हनन आहे अशा प्रकारच्या कारवाईने आम्ही घाबरणार नाही आणि दबणारही नाही. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत अस्लयाने हे लोक वैतागले आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहणार. यात्रा सुरूच राहील, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

सव्वा तासानंतर अटक

राणे आज संगमेश्वरच्या गोळवली गावात आले होते. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंविरोधातील जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि एसपी रत्नागिरीत आले. दुपारी 2.15च्या सुमारास राणे ज्या ठिकाणी थांबले होते तिथे पोलीस आले. पोलिसांनी राणेंना कागदपत्रं दाखवली आणि अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. राणे केंद्रीय मंत्री असल्याने राज शिष्टाचारानंतर सर्वसोपस्कार पार पडले. राणेंनी सर्व कागदपत्रे तपासली. त्यानंतर त्यांनी जेवण करून औषधे घेतली. यावेळी राणेंचा बीपी आणि शुगरचा त्रास वाढला. त्यामुळे सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होऊन राणेंची तपासणी केली. त्यानंतर सव्वा तासाने म्हणजे 3.30 वाजता राणेंना अटक केली.

किती वाजता काय घडलं?

10.30: नाशिक पोलीस आयुक्त हा राष्ट्रपती की पंतप्रधान? आमचं पण सरकार वर आहे : नारायण राणे

10.54 : राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा!

11.30 : तळकोकणातून पहिला हुंकार, नारायण राणेंची रॅली रोखण्याचा इशारा

11.43 : वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेचा एल्गार, राणेंच्या घराबाहेर धुमश्चक्री

12.34 : नाशिक पोलिसांचा प्लॅन बदलला, राणेंना चिपळूणमध्ये अटक करणार नाही!

1.31 : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, राणेंच्या वक्तव्याचं समर्थ नाही, पण त्यांच्या पाठी उभं राहण्याचं केलं स्पष्ट

2.04 : राणेंच्या जुहु बंगल्यासमोर युवासैनिक, शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले, चार शिवसैनिक जखमी

2.15 : राणेंना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांकडे वॉरंटच नाही, प्रमोद जठार यांचा दावा

2.21 : नारायण राणे यांना अटक

3.40 : नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेलं (bjp leader jp nadda first reaction on Narayan Rane’s arrested)

 

संबंधित बातम्या:

नारायण राणेंच्या वक्तव्याचा मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसणार? फडणवीसांचं थेट उत्तर

Narayan Rane Arrests : राणेंना पोलीस नाशिकला कोर्टात नेणार?, बंद खोलीत फक्त पोलीस आणि राणे, नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल

(bjp leader jp nadda first reaction on Narayan Rane’s arrested)