Kirit Somaiya : नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जेलरनं इंग्रजासारखी वागणूक दिली : किरीट सोमय्या

तर यावेळी सोमय्यांनी संजय राऊतांवर टीका केली. सोमय्यांनी म्हटलं की, संजय राऊतांनी १२ आरोप केले पण एकही कागद का दिला नाही ? हे त्यांनाच एकदा विचारा. संजय राऊत मुद्दा भरकटवत आहेत, असा आरोप ही सोमय्यांनी कोला.

Kirit Somaiya : नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जेलरनं इंग्रजासारखी वागणूक दिली : किरीट सोमय्या
बाजप नेते किरीट सोमय्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 3:04 PM

मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना हनुमान चालिसा म्हणल्यामुळे जेलमध्ये जावं लागलं आहे. तर राजद्रोहाच्या आरोपाखाली 11 दिवस जेलमध्ये काढावे लागलीत. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने काल नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांचाही जामीन मंजूर केला. आणि या दोघांचीही आज सुटका झाली. मात्र कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आमदार पती रवी राणा आणि बाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लीलावती रुग्णालयात जात नवनीत राणा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला केला. तसेच म्हटले की नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जेलरनं इंग्रजासारखी वागणूक दिली. तसेच याप्रकरणी मी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतल्याचेही सांगितलं आहे.

इंग्रजांच्या काळाची आठवण

नवनीत राणा यांच्या भेटीसाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले. हनुमान चालिसा म्हणल्यानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली 11 दिवस जेलमध्ये ठेवणाऱ्या माफिया सरकारची मला लाज वाटते. ही बेशरमीची हद्द झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून आपल्याला धक्का बसला. तसेच आपल्याला त्यांचा अनुभव ऐकून इंग्रजांच्या काळाची आठवण झाल्याचेही सोमय्या म्हणाले.

124 अ लावणं चुकीचं

तसेच मुंबई सत्र न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण राणा दाम्पत्याला जामीन देताना नोंदवलं. त्यांच्यावर लावण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचं सत्र न्यायालयानं म्हटल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच 124 अ लावणं चुकीचं असल्याचं सत्र न्यायालायनं जामीन अर्जावर सुनावणी देताना म्हटल्याचेही सोमय्या म्हणाले. तसेच सोमय्या यांनी, ज्यांनी राजद्रोह लावण्याचा द्रोह केलाय त्यांना जेल मध्ये टाकले गेले पाहिजे असं म्हणत ठाकरे सराकारवर निशाणा साधला आहे. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या जनतेच्या प्रतिनिधी असून त्या २२ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतात, असेही सोमय्या म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गृहमंत्रीवर कारवाई होणार का?

तर हनुमान चालिसा म्हणाणाऱ्या राणा दाम्पत्याला जर जेलमध्ये जाव लागत असेल आणि राजद्रोहाचा गुन्हा अंगावर घ्यावा लागत असेल तर हे योग्य नाही. तर माफियागिरी करणाऱ्या गृहमंत्रीवर कारवाई होणार का? हे सरकार पोलिसांचा माफिया म्हणून वापर करत आहे. दुसरीकडं शरद पवार म्हणतात राजद्रोह कलम काढून टाका आणि गृहमंत्री महिला खासदारावर राजद्रोहाचा कलम लावतात यावर शरद पवार साहेब माफी मागणार का ? असाही सवाल सोमय्या यांनी यावेळी विचारला.

राऊत मुद्दा भरकटवत आहेत

तर यावेळी सोमय्यांनी संजय राऊतांवर टीका केली. सोमय्यांनी म्हटलं की, संजय राऊतांनी १२ आरोप केले पण एकही कागद का दिला नाही ? हे त्यांनाच एकदा विचारा. यशवंत जाधव यांच्याबाबात बोलताना ते म्हणाले, यशवंत जाधव यांच्या ३८ बेनामी संपत्ती आहेत. त्यांच्यावर क्रिमिनल केस करावी. जाधवांवरील तक्रार १२ दिवसांपासून एफआयआर मध्ये घेतलेली नाही. यामागे नेमके कारण काय आणि कोण आहे? मुख्यमंत्र्यांनाच जाधवांवर एफआयआर होऊ द्यायची नाही. तर संजय राऊत मुद्दा भरकटवत आहेत, असा आरोप ही सोमय्यांनी कोला.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...