‘घर का लडका घर वापस आया’; मुकुल रॉय यांच्या टीएमसी प्रवेशानंतर ममतादीदींचं विधान
भाजपचे नाराज नेते मुकुल रॉय यांनी अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मुलासह त्यांनी टीएमसीत प्रवेश केला.
कोलकाता: भाजपचे नाराज नेते मुकुल रॉय यांनी अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मुलासह त्यांनी टीएमसीत प्रवेश केला. यावेळी ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. (bjp leader Mukul Roy returns to Trinamool fold after nearly four years)
मुकुल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांनी आज दुपारी टीएमसीमध्ये प्रवेश केला. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. प्रवेशाआधी रॉय यांनी टीएमसी कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी मंत्री राजीव बॅनर्जी आणि माजी आमदार सव्यसाची दत्ताही लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
भाजप ही एजन्सीची पार्टी
पक्षात पुन्हा प्रवेश केल्याने आनंद वाटत आहे. बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. माझा ममतादीदींना कधीच विरोध नव्हता, असं रॉय म्हणाले. तर, आपला पक्ष खूप शक्तीशाली आहे. रॉय यांनी निवडणुकीत कधीही आपल्या पक्षाविरोधात टीका केली नाही, असं सांगतानाच निवडणूक काळात ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. जे भाजपने केलं. ते आम्ही करणार नाही. भाजप ही सामान्य लोकांची पार्टी नाही. ती एक एजन्सी पार्टी आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.
भाजपमध्ये मान नव्हता
मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर टीएमसीतील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल रॉय यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. (bjp leader Mukul Roy returns to Trinamool fold after nearly four years)
BJP national vice president Mukul Roy and his son Subhranshu Roy join TMC in the presence of West Bengal CM Mamata Banerjee, in Kolkata. pic.twitter.com/WS9oFE2J79
— ANI (@ANI) June 11, 2021
संबंधित बातम्या:
West Bengal: ममतादीदींचा पुन्हा ‘खेला’, मुकुल रॉय यांची घरवापसी?; भाजपला मोठा झटका
West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शुन्यावर!
(bjp leader Mukul Roy returns to Trinamool fold after nearly four years)