Udaipur Kanhaiya Lal Murder Case : मृत कन्हैयालालच्या पत्नीच्या खात्यात भाजप नेत्याने ट्रान्सफर केले 1 कोटी
उदयपूर : नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीची हत्या(Udaipur Kanhaiya Lal Murder Case ) झाली. या हत्येमुळे देशात खळबळ उडाली असून भाजप पक्ष कन्हैयालालच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी कन्हैयालालच्या पत्नीच्या खात्यात 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून कन्हैयालालच्या कुटुंबियां मदत म्हणून […]
उदयपूर : नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीची हत्या(Udaipur Kanhaiya Lal Murder Case ) झाली. या हत्येमुळे देशात खळबळ उडाली असून भाजप पक्ष कन्हैयालालच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी कन्हैयालालच्या पत्नीच्या खात्यात 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत.
क्राउड फंडिंगच्या माध्यमातून कन्हैयालालच्या कुटुंबियां मदत म्हणून हा पैसा उभा केला असल्याचे कपिल मिश्रा यांनी सांगीतले. बुधवारी संध्याकाळी ट्विटवर मिश्रा यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत कन्हैयालालच्या पत्नीच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली असल्याची माहिती दिली. याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कन्हैयाच्या कुटुंबीयांना ५१ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
“तुमचे एक कोटी रुपये कन्हैयालाल जी यांच्या पत्नीच्या खात्यात पोहोचले आहेत.” ट्विटसोबत दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, 6 जुलैला आधी 50,00,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले आणि नंतर 49,98,889 रुपये पाठवण्यात आलेत असे ट्विट कपिल मिश्रा यांनी केले नुकतेच. नुकतीच कपिल मिश्रा यांनी कन्हैयाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
28 जून रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या झाली. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येनंतर कपिल मिश्रा यांनी कन्हय्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ऑनलाइन क्राउडफंडिंग सुरू केले. त्यांनी 30 दिवसांत 1 कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र 24 तासांत ही रक्कम जमा झाली.
बिना शोर शराबे के बीजेपी नेता कपिल मिश्रा ने मानवता का अच्छा उदाहरण प्रस्तुत किया है। उनके आह्वान पर कट्टरपंथ के शिकार कन्हैया लाल के परिवार के लिए आर्थिक सहायता हो पाई।@KapilMishra_IND pic.twitter.com/bxcmncggqC
— Rajan Kumar Jha (@RealRajanjha) July 7, 2022
त्यानंतर त्यांनी लक्ष्य वाढवून 1.25 कोटी रुपये केले आहे. कन्हैयाला वाचवताना जखमी झालेल्या ईश्वर सिंहच्या कुटुंबीयांनाही 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कपिल मिश्रा यांच्या आवाहनानंतक एकूण 1.7 कोटी रुपये जमा झाले.
उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांनीही मदत केली
उमेश कोल्हे जी की धर्मपत्नी के खाते में आपके दिए तीस लाख रुपये पहुंच गए हैं
₹ 30 lakhs credited to the bank account of wife of Umesh Kolhe ji ? #HinduEcosystem pic.twitter.com/ljnH6lVNn4
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) July 7, 2022
कपिल मिश्रा यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथील कोल्हेच्या कुटुंबालाही मदत जाहीर केली. त्यांनी गुरुवारी अमरावती येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणीच उमेश कोल्हे यांची देखील हत्या झाली.