Gautam gambhir : भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी, ISIS चे खबरी दिल्ली पोलिसांत?
दहशतवाद्यांनी गंभीर यांना आमचे खबरी दिल्ली पोलिसांत असल्याची धमकी दिली. गंभीर यांच्याबाबत सर्व महिती मिळत असल्याचंही दहशतवाद्यांकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर पुन्हा गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय.
नवी दिल्ली : खासदार आणि माजी भारतीय क्रिकेटपट्टू गौतम गंभीर यांना गंभीर धमक्या यायचं थांबत नाही. कारण गंभीर यांना आयसीस काश्मीरने तिसऱ्यांना धमकी दिली आहे. यावेळी तर दहशतवाद्यांनी गंभीर यांना आमचे खबरी दिल्ली पोलिसांत असल्याची धमकी दिली. गंभीर यांच्याबाबत सर्व महिती मिळत असल्याचंही दहशतवाद्यांकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर पुन्हा गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय. गंभीर यांना तिसऱ्यांदा धमकी मिळाल्यानं खळबळ माजली आहे.
गंभीर यांना आलेल्या धमकीच्या मेलमध्य काय?
आयसीस काश्मीर या दहशतवाादी संघटनेकडून गंभीर यांना यावेळी एक मेल आला आहे. त्यात त्यांनी दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काहीही करून शकत नाहीत. दिल्ली पोलिसांत आमचे खबरी आहेत. आम्हाला तुमची सर्व माहिती प्राप्त होत आहे, असं म्हटलं आहे. या मेलमुळे गौतम गंभीर यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
आयसीस काश्मीरची गंभीर यांना तिसरी धमकी
गौतम गंभीर यांना या आठवड्यात आलेली ही तिसरी धमकी आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यात गंभीर यांना याआधी दोनवेळा अशी धमकी मिळाली आहे. याआधीच्या मेलमध्ये गंभीर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर गंभीर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या सुरक्षेचा आढावा घेत सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तरीही गंभीर यांना पुन्हा धमकी आल्यानं दिल्ली पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गौतम गंभीर हे भाजपचे पूर्व दिल्ली मंतदारसंघाचे खासदार आहेत. एक आक्रमक चेहरा अशी गौतम गंभीर यांची ओळख आहे.