AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varun Gandhi : तिरंग्याची सक्ती लाजिरवाणी; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गरिबांवर भार न ठरावा, वरुण गांधींचा भाजपाला घरचा आहेर

 वरुण गांधी (Varun Gandhi)  यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत  स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल असं म्हटलं आहे.

Varun Gandhi : तिरंग्याची सक्ती लाजिरवाणी; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गरिबांवर भार न  ठरावा, वरुण गांधींचा भाजपाला घरचा आहेर
| Updated on: Aug 11, 2022 | 7:35 AM
Share

नवी दिल्ली: भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या वर्षभर केंद्र सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावतीने करण्यात आले आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र दुसरीकडे यावरून भाजपा (BJP) खासदार  वरुण गांधी (Varun Gandhi)  यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत  स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल असं म्हटलं आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिधापत्रिकाधारक तिरंगा ध्वज घेण्यासाठी आपल्यावर बळजबरी केली जात असल्याचा आरोप करत आहेत. तसेच तिंरगा ध्वज घेण्यासाठी आम्हाला वीस रुपये द्यायला सांगत आहेत, तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुम्हाला मोफत धान्य मिळणार नसल्याचेही सांगण्यात आल्याची तक्रार या व्हिडीओमधून करण्यात आली आहे. यावरून वरुण गंधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय वरुण गांधी यांनी?

वरुण गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल.  शिधापत्रिकाधारकांना आणि गरिबांना तिरंगा खरेदीची बळजबरी केली जात आहे. जर त्यांनी तिरंगा नाही घेतला तर त्यांना धान्य देखील दिले जात नाहीये.  प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तिरंगा आहे. मात्र अशा पद्धतीने जर गरिबांची गळचेपी हेत असेल तर ही गोष्ट लाजिरवाणी असल्याची टीका वरुण गांधी यांनी केली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

वरुण गांधी यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही मजूर दिसत आहेत. त्यांनी तक्रार केली आहे की, आम्हाला झेंडा घ्यायचा नाही मात्र झेंडा घेण्यासाठी आमच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे. आमच्याकडे पैसे नाहीत तरी आमच्याकडून वीस रुपये जबरदस्तीने वसूल केले जात आहेत. तिरंगा न घेतल्यास तुम्हाला रेशन मिळणार नाही असे आम्हाला सांगण्यात आल्याचे हे नागरिक म्हणत आहेत.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.