राम मंदिराला 11 कोटींचं दान अन् जवळपास 5000 कोटींच्या मालकाला भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, कोण आहे

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगली फिल्डिंग लावली आहे. जास्तीत जास्त जागांसाठी भाजप ताकद लावताना दिसत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतही भाजप दूरदृष्टी ठेवून उमेदवारांची निवड करत असावं, अशातच स्वत: पंतप्रधान मोदींनी एका नावावर शिक्कमोर्तब केलं आहे.

राम मंदिराला 11 कोटींचं दान अन्  जवळपास 5000 कोटींच्या मालकाला भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, कोण आहे
Narendra Modi
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 2:13 PM

नवी दिल्ली | देशभरात आता लोकसभा निवडणुकीचा आखाडा मारण्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुक तोंडावर असताना भाजपने विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे घेत डॅमेज करायला सुरूवात केलीये. राम मंदिराच्या उद्घाटनामुळे भाजपकडे आता मोठा मुद्दा आहे. या निवडणुकीअगोदर राज्यसभेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. भाजप या जागांवर भक्कम उमेदवार देत आहे, जेणेकरून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल. अशातच भाजपने गुजरातमधील राज्यसभेच्या जागेसाठी सुरतमधील बड्या व्यापाऱ्याला उमेदवारी दिली आहे. कोण आहेत जाणून घ्या.

भाजपकडून कोणाला मिळाली उमेदवारी?

भाजपने देशतील डायमंट सिटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरत शहरामधील हिरे उद्योगपती गोविंद भाई ढोलकिया यांना उमेदवारी दिली आहे. गोविंद भाई ढोलकिया यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रूपयांची देणगी दिली होती. गोविंदभाई ढोलकिया 74 वर्षांचे असून ते सहावी शिकलेले आहेत. राजकारणात किंवा राज्यसभेवर जाईल असं मला कधीट वाटलं नव्हतं, असं गोविंदभाई ढोलकिया म्हणाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोविंदभाई ढोलकिया यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

गोविंदभाई ढोलकिया यांची एकूण मालमत्ता 4,800 कोटी रूपये आहे. गोविंदभाई ढोलकिया यांची कंपनी थायलंड, हाँगकाँग, अमेरिका आणि जपान य देशांमध्ये हिरे निर्यात करते. त्यासोबतच त्यांच्या कंपनीचे आर्क्टिक कॅनेडियन डायमंड कंपनी लिमिटेड आणि रिओ टिंटो यांच्याशी करार आहेत.

दरम्यान, गोविंदभाई ढोलकिया यांच्या कंपनीमध्ये एकूण सहा हजारांपेक्षा जास्त लोक काम करतात. दिवसेंदिवस कामगारांच्याही संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या कंपनीचा 2021-22 मधील टर्न ओव्हर 16,000 कोटी होता. या कंपनीजे प्रमुख ग्राहक आहेत त्यामध्ये तनिष्क आणि डी बिअर्ससारख्या मोठ्या कंपन्यांच समावेश आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.