INDIA | इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘इंडिया’, पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर सर्वात मोठा हल्ला
INDIA | काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीवर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच मोठा हल्लाबोल केलाय. इंडिया नाव लावलं म्हणून सर्वकाही होत नाही, असं मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर मोठा हल्ला केला आहे. असा दिशाहीन विरोधी पक्ष आजापर्यंत पाहिलेला नाही, असं मोदी म्हणाले. पीएम मोदी यांनी विरोधी पक्षाच्या आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीसोबत केली. फक्त इंडिया नाव लावलं म्हणून सर्वकाही होत नाही, असं मोदी म्हणाले. ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा इंडिया नाव लावलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नावातही इंडिया आहे अशी बोचरी टीका मोदी यांनी केली.
विरोधी पक्ष विखुरलेला आणि हताश आहे, असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या खासदारांना सल्ला दिला. विरोधी पक्षांच काम आंदोलन करणं आहे. ते त्यांना करुं दे. आपण आपल्या कामावर लक्ष देऊ या, असं मोदी यांनी सांगितलं.
तिसऱ्या टर्ममध्ये मोदींच लक्ष्य काय?
विरोधी पक्षांना दीर्घकाळासाठी सत्तेत येण्यााची इच्छा दिसत नाहीय. त्यांनी नेहमीच विरोधी बाकांवर बसायच आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवायच आहे, असं त्यांनी सांगितलं. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायची आहे. विरोधी पक्ष पूर्णपण दीशाहीन आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
काय म्हणाले रविशंकर प्रसाद?
भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांमी सुद्धा विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षाला जनतेने नाकारल आहे. 2024 मध्ये पुन्हा भाजपा सत्तेत येईल असं रविशंकर प्रसाद म्हणाले. आम्हाला आमच्या पंतप्रधानांवर गर्व आहे. आम्ही 2024 मध्ये सत्तेत परतणार आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना परदेशी नागरिकाने केली होती. आज लोक इंडियन मुजाहिदीन आणि इंडियन पीपुल्स फ्रंटच्या नावाचा वापर करतायत, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.