जल्लोष आहे देशाचा, कारण वाढदिवस आहे मोदींचा; या दिवशी जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मिळणार ‘ही’ मौल्यवान गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे.

जल्लोष आहे देशाचा, कारण वाढदिवस आहे मोदींचा; या दिवशी जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मिळणार 'ही' मौल्यवान गोष्ट
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 3:37 PM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendr Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस (Brithday) आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून तामिळनाडूमध्ये नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे.

याबरोबरच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमार्फत 720 किलो मासळी वाटप केली जाणार आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपकडून चेन्नईतील आरएसएस रुग्णालयाची निवड केली आहे.

या रुग्णालयात 17 सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. त्या प्रत्येक अंगठीची किंमत 5 हजार रुपये असणार आहे.

नवजात बालकांना सोन्याची अंगठी वाटप केले जाण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 720 किलोग्रॅम मासळी वाटली जाणार आहे.

यावेळी मंत्री मुरुगन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे मासळी वाटली जाणार असून नागरिकांना मासे खाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

नरेंद्र या वाढदिवसाबरोबरच महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.