Elections 2022: निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक, 300 नेते उपस्थित राहणार
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 300 नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतीसाठी भाजपची रणनीतीवर चर्चा होणार असल्यचं सांगितलं जातय. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होणार असून दुपारी 4.30 वाजेपर्यंत चालणार आहे. भाजपची ही एक दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने सुरू होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने संपेल. (BJP to hold national level meeting ahead of state elections in delhi 300 leaders to participate)
बैठकीला कोण उपस्थित राहणार?
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे 300 नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे असणार आहे.
बैठकीचा अजेंडा काय आहे?
निवडणुकीच्या तयारीवर चर्चा हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीत पक्षाध्यक्षांचे भाषण होणार असून, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होणार आहे. यासोबतच एक प्रस्तावही आणला जाईल ज्यामध्ये सर्व राजकीय मुद्दे, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांचा समावेश असेल.
भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे हायकमांड या राज्यांमध्ये सातत्याने सभा घेत आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी भाजप सातत्याने कार्यकर्ता परिषदा घेत आहे. अशा स्थितीत 7 नोव्हेंबरला होणारी ही बैठक निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Related News
By Election 2021 Results: हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा; काँग्रेसचा उत्साह वाढला
अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा; सोनिया गांधींना पत्र लिहून दिला पक्षाचा राजीनामा
Assembly by Election result : 13 राज्यातील 29 विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट; कोणत्या राज्यात कुणाला झटका, कुणाचा विजय?
BJP to hold national level meeting ahead of state elections in delhi 300 leaders to participate