पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार, भाजपाने बोलावली CEC ची बैठक

पण, सध्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बैठक घेण्यात आली. त्यामुळे आतापासून भाजप या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार, भाजपाने बोलावली CEC ची बैठक
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 7:47 PM

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहतील. अद्याप विधानसभा निवडणुकीचा घोषणा झालेली नाही. आतापर्यंत निवडणुका जाहीर झाल्यानंतर बैठका होत होत्या. पण, सध्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बैठक घेण्यात आली. त्यामुळे आतापासून भाजप या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपची केंद्रीय निवडणूक समिती उमेदवारांचे नाव निश्चित करते. तसेच निवडणुकीची रणनीती ठरवते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या निवडणुकीची तयारी या बैठकीच्या माध्यमातून भाजप सुरू करत आहे. बैठकीत भाजपच्या कमजोर असलेल्या जागांवर विचार करण्यात येईल. निवडणुका जिंकण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगडचा विचार केला जात आहे.

कर्नाटकात १० मे रोजी निवडणुका होत्या. परंतु, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ९ एप्रिल रोजी झाली होती. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा ३० मार्च रोजी केली. भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी दहा दिवसांनी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेतली. फक्त कर्नाटकचं नव्हे तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशातही निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती.

गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा चार नोव्हेंबरला झाली. मतदान एक आणि पाच डिसेंबरला झाले. भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक ९ नोव्हेंबर २०२२ ला झाली. गुजरात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाच दिवसांनी बैठक झाली होती. हिमाचल विधानसभा निवडणुकीची घोषणा १४ ऑक्टोबरला झाली. त्यानंतर १२ नोव्हेंबरला मतदान झाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निवडणूक घोषणेच्या आधीच १३३ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले होते. याच फॉर्म्यूल्यावर काँग्रेस मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काम करत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सप्टेंबरपर्यंत उमेदवार जाहीर करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाला गळ घातली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.