लखनऊ: उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. त्यानिमित्ताने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपने ऑनलाईन कँम्पेन सुरू केलं आहे. त्यासाठी भाजपने घोषणाही तयार केल्या आहेत. मात्र, या घोषणेतील तीन शब्द उर्दूतील असल्याचं सांगत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भाजपची फिरकी घेतली आहे.
राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कामाची जंत्री सादर करण्यासाठी भाजपने या घोषणा तयार केल्या आहेत. ‘सोच ईमानदार काम दमदार-फिर एक बार बीजेपी सरकार’ अशी एक घोषणा भाजपने तयार केली आहे. त्यावरून जावेद अख्तर यांनी भाजपची फिरकी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील भाजपची घोषणा ऐकली. ‘सोच ईमानदार काम दमदार’ ही घोषणा ऐकून बरं वाटलं. पण या चार शब्दातील तीन शब्द उर्दूचे आहेत. ईमानदार, काम और दमदार हे तीन शब्द उर्दूचे आहेत, असं अख्तर यांनी म्हटलं आहे.
जावेद अख्तर यांनी भाजपच्या घोषणेचा पंचनामा केल्यानंतर नेटकरीही कामाला लागले आहेत. त्यांनी हे शब्द कसे हिंदीचेच आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काम हा शब्द संस्कृतमधील कर्म या शब्दापासून तयार झाला आहे. तर काही यूजर्सच्या मते ईमान हा फारसी शब्द आहे. त्यावरून ईमानदार हा शब्द तयार झाला आहे. काम हा हिंदीच शब्द आहे. संस्कृतमधील कर्म पासून तो तयार झाला आहे. दम हा शब्द सुद्धा संस्कृतपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ शक्तीशाली व्यक्ती. ज्याने आपल्या इंद्रियांवर मात केली असा व्यक्ती. बल विवेक दम परहित घोरे… असं तुलसीदासांनीही म्हटलं आहे, असं काही यूजर्सने अख्तर यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.
तर, हे सर्व शब्द हिंदीचे आहेत. हिंदी ही एक समृद्ध भाषा आहे. त्यात संस्कृत, फारसी, पाली, अरबी आणि तुर्कीसहीत अन्य भाषांचे शब्द आहेत. हिंदीही उर्दूपेक्षा अधिक जुनी भाषा आहे. त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती तपासून पाहा, असं एका नेटिजन्सने म्हटलं आहे.
Nice to see that the slogan of UP BJP “ soch imaandar kaaam dumdaar “ has out of four three urdu words , imaandar , kaam and Damdar .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) December 7, 2021
संबंधित बातम्या: