Boris Johnson India Visit: ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी चालवला चरखा! मोदी भेटीआधी काय काय केलं?
Boris Johnson India Visit: ब्रिटनचे पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा दौऱ्याचं प्रमुख आकर्षण हे मोदींसोबत होणारी भेट जरी असलं तरी त्याआधी त्यांनी गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या.
अहमदाबाद : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर (India Visit) आहेत. आज सकाळी त्यांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत करण्यात आलं. यानंतर जॉन्सन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) राजधानीत दिल्ली भेटही घेतील. त्याआधी त्यांनी अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेश पटेलही त्यांच्यासोबत होते. यावेळी बोरीस जॉन्सन यांनी चरख्यावर सूत कातलं. एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतचा व्हिडीओही शेअर केला आहे. यावेळी महात्मा गांधी यांची शिष्य मेडेलीन स्लेड उर्फ मीराबेन यांची आत्मकथा साबरमती आश्रमाच्या वतीनं बोरीस जॉन्सन यांना भेट म्हणून देण्यात आली. महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या पहिल्या दोन पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक कधीच प्रकाशित झालेलं नव्हतं.
पाहा व्हिडीओ :
#WATCH | Prime Minister of the United Kingdom Boris Johnson visits Sabarmati Ashram, tries his hands on ‘charkha’ pic.twitter.com/6RTCpyce3k
— ANI (@ANI) April 21, 2022
मोदी भेटीचं आकर्षण
ब्रिटनचे पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा दौऱ्याचं प्रमुख आकर्षण हे मोदींसोबत होणारी भेट जरी असलं तरी त्याआधी त्यांनी गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. साबरमती आश्रमासोबतच बोरीस जॉन्सन हे गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिलाही भेट देणार आहेत. तसंच वडोदराजवळ असलेल्या एका जेसीबी कंपनीला भेट देणार आहे. यानंतर दिल्लीत त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शुक्रवारी भेट होईल.
‘The Spirit’s Pilgrimage’, the autobiography of Madeleine Slade or Mirabehn who became the Mahatma Gandhi’s disciple will be gifted to UK PM Boris Johnson by Sabarmati Ashram pic.twitter.com/B9IAWyR712
— ANI (@ANI) April 21, 2022
मोठ्या गुंतवणुकीची शक्यता
अहमदाबादेत ब्रिटेनचे पंतप्रधान बॉरीस जॉन्सन प्रमुख उद्योगपतींचीही भेट घेणार आहे. भारत आणि ब्रिटेन यांच्या संबंधांतून व्यवहार वाढावा आणि अर्थकारणावर चर्चा व्हावी, या दृष्टीनं या भेटील महत्त्व प्राप्त झालंय. ब्रिटेनकडून भारतात वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक केली जाण्याची घोषणाही या दौऱ्यादरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून केली जाऊ शकते.
#WATCH | UK Prime Minister Boris Johnson arrived in Ahmedabad earlier in the morning to start his India visit and was accorded a grand welcome at the airport
He will later travel to New Delhi to meet PM Modi. pic.twitter.com/7ImtyLXhNZ
— ANI (@ANI) April 21, 2022