रात्री प्रेयसीला चोरुन भेटायला गेला, घरचे आले म्हणून लपण्याच्या प्रयत्नात जे घडलं त्याने सर्वच…

प्रेमात पडल्यानंतर तरुणाई काय करेल याचा नेम नाही. प्रेमाखातर प्रेयसीला मध्यरात्री भेटायला गेला. मात्र ती भेट शेवटचीच ठरली.

रात्री प्रेयसीला चोरुन भेटायला गेला, घरचे आले म्हणून लपण्याच्या प्रयत्नात जे घडलं त्याने सर्वच...
प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचा इमारतीवरुन पडून मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 4:27 PM

हैदराबाद / 8 ऑगस्ट 23023 : असं म्हणातात प्रेम आंधळं असतं. प्रेमात माणूस काय करेल याचा नेम नाही. कधी कधी आंधळ्या प्रेमात उचलले पाऊलही घातकही ठरते. अशीच एक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास प्रियकर प्रेयसीच्या घरी तिला भेटायला गेला. मात्र इतक्यात तिच्या घरचे आल्याची चाहूल लागली, म्हणून तो लपण्याचा प्रयत्न करत होता. पण याच प्रयत्नात तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडला आणि यात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद शोएब असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला अन्…

मोहम्मद एका बेकरीत सेल्समनचे काम करत होता. तो रोज दुपारी 1 ते रात्री 1 पर्यंत कामाला जायचा. नेहमीप्रमाणे 6 ऑगस्ट रोजी तो कामावर गेला. त्यानंतर कामावरुन निघाल्यावर रात्री 2.45 च्या सुमारास तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. दोघं जण बोलत असतानाच कुणीतरी आल्याची चाहूल त्यांना लागली. यामुळे मोहम्मद लपण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू

तरुणाच्या घरच्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाला उस्मानिया रुग्णालयात नेले. मात्र त्याचा फायदा झाला नाही. गंभीर जखमी झाल्याने मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या वडिलांनी याबाबत चौकशी करुन योग्य कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. तपासानंतरच हा अपघात आहे की घातपात याबाबत स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.