प्यार दिवाना होता है…! गर्लफ्रेण्डचे लग्न रोखण्यासाठी प्रियकराचे ‘सीएम’ना साकडे; धम्माल करणारे ट्विट व्हायरल

लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांवर बंदी घाला, जेणेकरून माझ्या गर्लफ्रेण्डचे लग्न होणार नाही, अशी विनंती प्रियकर करू लागला आहे. याचे ट्विट सोशल मीडियात चांगलीच धम्माल करते आहे. (Boyfriend's 'CM' to prevent girlfriend's marriage; Dhammal's tweet goes viral)

प्यार दिवाना होता है...! गर्लफ्रेण्डचे लग्न रोखण्यासाठी प्रियकराचे ‘सीएम’ना साकडे; धम्माल करणारे ट्विट व्हायरल
गर्लफ्रेण्डचे लग्न रोखण्यासाठी प्रियकराचे ‘सीएम’ना साकडे
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 7:01 PM

बिहार : कोरोनाने देशच काय, अख्खं जग चिंतेत आहे. या संकटातून आपण बाहेर कधी पडणार, हे कुणी अजून निश्चित सांगितलेले नाही. या टेन्शनला गोळी मारणारे बरेच व्हिडीओ, ट्विट, पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होताहेत. असेच एक हटके ट्विट आहे, बिहारमधील प्रियकराचे. हा प्रियकर प्रेमात एवढा वेडा झाला आहे की गर्लफ्रेण्डचे दुसऱ्याबरोबर लग्न लागतेय हे कळल्यापासून पुरता हैराण झाला आहे. गर्लफ्रेण्डचे लग्न थांबवायचे कसे, यासाठी त्याने गेले अनेक दिवस नाना प्रकारच्या क्लृप्त्या लढवल्या. पण त्यातून काहीच साध्य झालेले नाही. शेवटी त्याने चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापुढे हात जोडले आहेत. त्याची विनंती दोघांच्या लग्नात मध्यस्थी करण्यासाठी नाहीए, तर चक्क राज्यातील लॉकडाऊनदरम्यान लग्न सोहळ्यांवर पूर्णपणे निर्बंध घालण्याची आहे. लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांवर बंदी घाला, जेणेकरून माझ्या गर्लफ्रेण्डचे लग्न होणार नाही, अशी विनंती प्रियकर करू लागला आहे. याचे ट्विट सोशल मीडियात चांगलीच धम्माल करते आहे. (Boyfriend’s ‘CM’ to prevent girlfriend’s marriage; Dhammal’s tweet goes viral)

नितीशकुमारांच्या ट्विटवर प्रियकराची हटके कमेंट

बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन होता. त्यानंतर 13 मे रोजी सरकारने आपत्ती व्यवस्थापन गटासोबत बैठक केल्यानंतर काही नियमांमध्ये बदल केला. नितीशकुमार सरकारने लॉकडाऊन 25 मेपर्यंत वाढवले. 13 मे रोजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वत:च याबाबत ट्विट केले. त्यावर पंकज कुमार गुप्ता नावाच्या तरुणाने कमेंट करून गर्लफ्रेण्डचे लग्न थांबवण्यासाठी लॉकडाऊन काळात लग्न सोहळ्यांवरही बंदी घालण्याची हटके विनंती केली. ‘सर, जर लग्न सोहळ्यांवरही बंदी घातली तर माझ्या गर्लफ्रेण्डचे 19 मे रोजी होणारे लग्न थांबेल. तुमचा मी आयुष्यभर ऋणी राहीन’ असे कमेंट करून पंकज कुमार गुप्ताने गर्लफ्रेण्डचे लग्न रोखण्यासाठी हटके स्टाईलचा प्रेमवेडा प्रयत्न केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे ट्विट वाचण्यासाठी ट्विटरला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांनी पंकज कुमार गुप्ताच्या कमेंटला आवर्जुन एक लाईक दिला. एवढेच नव्हे तर त्याच्या कमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक त्याच्या कमेंटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत. प्रेम करावं तुझ्यासारखं, तुझ्यासारखी जिद्दी प्रेमवीर शोधून सापडायचा नाही, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवून नेटकऱ्यांनी प्रेमवेड्या पंकज कुमार गुप्ताला भरभरून दाद दिली आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्येही असाच एक प्रेमवीर प्रेयसीचे लग्न रोखण्याच्या प्रयत्नामुळे सोशल मीडियात ‘हिरो’ ठरला होता. अंकुर डोरवाल असे त्या प्रियकराचे नाव. त्यानेही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना ट्विट करून लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता बिहारच्या पंकज कुमार गुप्ताचे ट्विट सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

प्रेयसीचे जबरदस्त उत्तर

पंकज कुमार गुप्ताचे ट्विट प्रचंड व्हायरल होऊन अखेर त्याच्या प्रेयसीपर्यंत पोहोचले. त्यावर प्रेयसीनेही जबरदस्त उत्तर देऊन सोशल मीडियातील नेटकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. तिने पंकज कुमारला त्यांच्या प्रेमप्रवासातील किस्सा आठवण करून दिला. ‘तू जेव्हा मला सोडून पुजाबरोबर बोलायला गेला होता, त्यावेळी मीसुद्धा खूप रडली होती. आज मी खुशीने लग्न करतेय. त्यामुळे प्लीज अस्सं करू नको. परंतु, पंकज मी भले दुसऱ्याबरोबर लग्न करीत असेन, परंतु माझ्या ह्रदयात तूच असशील. लग्नात जरुर ये. मी तुला पाहून लग्न करू इच्छिते,’ असे प्रेयसीचे हटके उत्तर चांगलीच करमणूक करीत आहे. (Boyfriend’s ‘CM’ to prevent girlfriend’s marriage; Dhammal’s tweet goes viral)

इतर बातम्या

‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांना मोठा दिलासा, उपचाराचा सर्व खर्च म. फुले जनआरोग्य योजनेतून होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आजीचा राजकीय वारसा, सख्ख्या बहिणीविरोधात निवडणूक लढल्या; वाचा, यशोमती ठाकूर यांचा राजकीय संघर्ष

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.