राहुल गांधीच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरु होण्यापूर्वीच ग्रहण ! मणिपूर सरकारची मनाई

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरु होण्यापूर्वीच ग्रहण लागले आहे. येत्या 14 जानेवारीला मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर मणिपूरच्या इम्फाळ येथून ही यात्रा सुरु होणार होती. परंतू आता मणिपूर सरकारने यात्रेला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

राहुल गांधीच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरु होण्यापूर्वीच ग्रहण ! मणिपूर सरकारची मनाई
rahul gandhi Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 4:57 PM

मुंबई | 10 जानेवारी 2024 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच ग्रहण लागले आहे. राहुल गांधीच्या यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 14 जानेवारीपासून मणिपूर राज्यातून होणार होती. परंतू मणिपूर राज्यातील सध्याची कायदा सुव्यवस्था पाहाता मणिपूरच्या मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांनी यात्रेला परवानगी देण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या इम्फाळ येथील पॅलेस ग्राऊंड येथून सुरु होणार होती. मणिपूर येथील सध्याची परिस्थिती पाहून राहुल गांधी यांनी मणिपूर सरकारने परवानगी न दिल्याने आता त्यांना दुसऱ्या ठिकाणाहून आपली भारत जोडो न्याय यात्रा सुरु करावी लागणार आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर पुन्हा आपली पदयात्रा सुरु करण्याची घोषणा केली होती. यावेळी ही पदयात्रा मणिपूर येथून सुरु होऊन मुंबईत तिचा समारोप होणार आहे. या यात्रेला आधी न्याय यात्रा असे नाव दिले होते. त्यानंतर तिचे नाव बदलून ‘भारत जोडो, न्याय यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे. ही पदयात्रा 14 जानेवारीला मकरसंक्रातीच्या दिवशी सुरु होऊन 20 मार्च रोजी तिचा समारोप होणार आहे. मणिपूर येथून यात्रेला परवानगी नाकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मणिपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कीशम मेगाचंद यांनी म्हटले आहे. आम्ही मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांची भेट घेतली. आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हट्टा कांगेजेइबुंग येथून यात्रेची परवानगी मागितली. येथे एक सभा झाल्यानंतर यात्रेला हिरवा झेंडा दाखविला जाणार होता. परंतू मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्यास नकार दिल्याचे मेगाचंद्र यांनी सांगितले.

 आम्हाला राजकारण करायचे नाही

आम्हाला या यात्रेतून काही राजकारण करायचे नाही. आम्हाला मणिपूरचा काही मुद्दा करायचा नाही. ही एक शांततापूर्ण यात्रा आहे. ही यात्रा आम्ही भारताच्या लोकांसाठी काढत आहोत. विशेष करून मणिपूरच्या लोकांसाठी ही यात्रा आहे. हा काही हिंसा मार्च नाही. आम्ही सरकारला सहकार्य करतोय याचा अर्थ असा नाही की त्यांनी आमची यात्राच रोकावी असा सवाल कॉंग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

पहिली भारत जोडो यात्रा फळली होती

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रे अंतर्गत 67 दिवसात 6713 किमीचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा 15 राज्याच्या 110 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. 100 लोकसभा मतदार संघातून ही यात्रा प्रवास करणार आहे. मुंबईत या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. राहुल गांधी यांनी याआधी कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत  4000 किमी लांबीची ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. त्यामुळे देशातील वातावरण बदलले आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.