नियतीचा घाला ! नवरदेवाची दारात वरात, लग्नाचा जल्लोष, नवरीला हृदयविकाराचा झटका, संपूर्ण देश हळहळला

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दु:ख येत असतं. मात्र, ते कधी येईल हे कधीच सांगता येणार नाही (Bride death during marriage ceremony in UP)

नियतीचा घाला ! नवरदेवाची दारात वरात, लग्नाचा जल्लोष, नवरीला हृदयविकाराचा झटका, संपूर्ण देश हळहळला
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 6:48 PM

लखनऊ : प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दु:ख येत असतं. मात्र, ते कधी येईल हे कधीच सांगता येणार नाही. नियतीने आपल्या आयुष्यात नेमकं काय लिहून ठेवलंय हे वेळ आल्याशिवाय समजत नाही. आज आपण हसत जगत आहोत. उद्या कदाचित आपल्यावर दु:खाचा मोठा डोंगरही कोसळेल. पण यावेळी संयम राखणं जास्त आवश्यक असतं. कठीण काळात संयमावरचा ताबा सुटला तर खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे या काळात तग धरत उभं राहाणं जास्त आवश्यक असतं. योग्य निर्णय घेणं जास्त जरुरीचं असतं. तसा निर्णय अनेकजण घेतातही. अगदी तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या इटावा येथे बघायला मिळाला आहे (Bride death during marriage ceremony in UP).

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही इटावाच्या भरथना भागात घडलीय. भरथना येथे 25 मे रोजी लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरभी चंद या तरुणीचं मंजेश ग्राम नावली चितभवन याच्यासोबत लग्न ठरलं होतं. संध्याकाळची वेळ होती. नवरदेव मंजेश वरात घेऊन नवरीकडे आला होता. लग्नाची लगबग सुरु होती. सर्वजन आनंदात होते. कुणी नाचत होतं. तर कुणी आणखी काही करत होतं. सर्वत्र जल्लोषाचं वातावरण होतं. या आनंदाच्या वातावरणावर नियतीने मिठाचा खडा टाकला. मध्यरात्री दोन वाजता नवरीला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. आनंदाच्या या वातवरणावर विरझन पडलं (Bride death during marriage ceremony in UP).

नवरीचा मृत्यू, लहान बहिणीसोबत नवरदेवाचं लग्न

नवरीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या हृदयाच्या ठोक्यांची गती कमी झाली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यादरम्यान नवरीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अख्ख्या मंडपात शांतता पसरली. संपू्र्ण गाव सुन्न झालं. मात्र, वधू-वर दोन्ही पक्षाचे नातेवाईक लग्नासाठी आले होते. त्यामुळे लग्नाचं काय करायचं? असा काहींना सवाल पडला. यावेळी घरातील ज्येष्ठांनी नवरीच्या लहान बहिणीचं नवरदेव मंजेश यांच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला. दोन्ही पक्षाकडून याबाबत चर्चा झाली. त्यानंतर दोघांचं यावर एकमत झालं.

मृतक नवरीच्या पार्थिवावर लग्नानंतर दुसऱ्या दिवशी अंत्यविधी

मृतक नवरीचा मृतदेह एका बंद खोलीत काही काळासाठी ठेवण्यात आला. नवरीच्या लहान बहिणीसोबत नवरदेवाचं लग्न लावण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतक नवरीच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. या घटनेवर उत्तर प्रदेशात हळहळ व्यक्त केली जात. नवरी मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी असा प्रकार घडणं हे अपेक्षित नव्हतं, असं काहीचं म्हणणं आहे.

हेही वाचा : Video | मुलाने होकार देताच लग्नाळू नवरी फुलली, होणाऱ्या नवऱ्याला थेट किस करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.