BSPचे 7 बंडखोर आमदार निलंबित, सपाला हरवण्यासाठी भाजपलाही मतदान करणार – मायावती

राज्यसभा निवडणुकीदरम्यान BSP च्या सात आमदारांनी समाजवादी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला मदत केली. यामुळं BSP बॅकफुटवर गेली. पण आपल्या उमेदवाराला विजयी करण्यात मायावती यशस्वी ठरल्या. या बंडखोरीमुळे मायावती यांनी आपल्या ७ आमदारांचं निलंबन केलं.

BSPचे 7 बंडखोर आमदार निलंबित, सपाला हरवण्यासाठी भाजपलाही मतदान करणार - मायावती
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 12:21 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीदरम्यान बहुजन समाज पार्टी अर्थात BSPमध्ये मोठी बंडखोरी पाहायला मिळाली. त्यावरुन उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. राजसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ७ आमदारांना BSP अध्यक्ष मायावती यांनी पार्टीतून निलंबित केलं आहे. यात अस्लम राइनी, अस्लम अली, मुजतबा सिद्दिकी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल आणि वंदना सिंह यांचा समावेश आहे. (BSP chief Mayavati on suspension of rebel MLA’s )

राज्यसभा निवडणुकीदरम्यान BSP च्या सात आमदारांनी समाजवादी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला मदत केली. यामुळं BSP बॅकफुटवर गेली. पण आपल्या उमेदवाराला विजयी करण्यात मायावती यशस्वी ठरल्या. या बंडखोरीमुळे मायावती यांनी आपल्या ७ आमदारांचं निलंबन केलं. तसंच येणाऱ्या MLC निवडणुकीत आपले आमदार समाजवादी पार्टीविरोधात मतदान करतील. मग भाजप उमेदवारालाही मतदान करण्याची वेळ आली तरी करु, असं जाहीरही करुन टाकलं. लोकसभा निवडणुकीवेळी समाजवादी पार्टीसोबत केलेली युतीही मोठी चूक असल्याचंही यावेळी मायावती म्हणाल्या.

“लोकसभा निवडणुकीनंतर समाजवादी पार्टी बदलली”

प्रतिगामी पक्षाविरुद्ध लढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत युती केली होती. पण त्यांच्या परिवारातील कलहामुळं या युतीचा काही फायदा झाला नाही. तसंच निवडणुकीनंतर समाजवादी पक्षानं आमच्यापासून दोन हात दूर राहणंच पसंत केलं. त्यामुळं समाजवादी पार्टीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं मायावती यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Hathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

मायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला

BSP chief Mayavati on suspension of rebel MLA’s

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.