Budget 2021 | अर्थसंकल्पादिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, LPG गॅस सिलिंडर महागला
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच इंडियन ऑईल आणि LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्य लोकांना मोठा झटका मिळाला आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच इंडियन ऑईल आणि LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या किमतीची समिक्षा करते आणि नव्या दरांची घोषणा करत असते. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत. कमर्शियल LGP गॅस सिलिंडरची किंमत 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढवण्यात आली आहे. तर घरगुती गॅसच्या किमतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. हे नवे दर आज 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत.(LPG cylinder price hike on Union Budget Day)
देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. तर घरगुती गॅसच्या किमतीत कुठलिही वाढ करण्यात आलेली नाही. यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत दोन वेळा 100 रुपयाने वाढ केली होती. कंपनीनं यापूर्वी 2 डिसेंबरला 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.
महिन्याला किमतीची समिक्षा
भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.
8 कोटी लोकांना LPG सबसिडीचा फायदा
देशातील उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ८ कोटी लोकांना गॅस सबसिडीचा फायदा मिळतो. 2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 37 लाख 2 हजार 565 कोटी रुपये LPG सबसिडीसाठी दिले होते.
संबंधित बातम्या :
Budget 2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ‘वाटाण्याच्या अक्षता’, विरोधकांचा हल्लाबोल
LPG cylinder price hike on Union Budget Day