मोबाईल विकत घेणाऱ्यांची चांदी, चार्जर आणि स्मार्टफोन झाले स्वस्त

मोबाईल फोनच्या सुट्या भागांना आयात करताना जो टॅक्स भरावा लागत होता. तो आता कमी केला जाणार आहे. त्यामुळे मोबाईल फोन्स आणि चार्जर स्वस्त होणार आहेत.

मोबाईल विकत घेणाऱ्यांची चांदी, चार्जर आणि स्मार्टफोन झाले स्वस्त
Mobile phones and chargers have become cheaper
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 1:46 PM

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या एनडीए सरकारचा अर्थसंकल्प 2024  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मंगळवारी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. देशातील 80 कोटी जनतेला रेशनवरील धान्य आणखी पाच वर्षे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच मोबाईल आणि चार्जरवरील कर कमी केल्याने मोबाईल आणि चार्जर स्वस्त होणार आहेत. स्मार्टफोन आणि चार्जरवरील कस्टम ड्यूटी कमी करीत 15 टक्के केली आहे. त्यामुळे मोबाईल फोन आणि चार्जर घेणाऱ्यांना ते आणखीन स्वस्त मिळणार आहेत.

या आधी मोबाईल आणि चार्जर फोनवरील सीमाशुल्क 20 टक्के होते. भारतात गेल्या सहा वर्षांत मोबाईलचे प्रोडक्शन वाढले आहे. मोबाईलच्या निर्मितीत तीन टक्के वाढ झाली आहे. परंतू आजही मोबाईल फोनचे सर्वात मोठे मार्केट चीन असून तेथून बहुतांश मोबाईल फोन आयात केले जात आहेत. त्यामुळे सीमाशुल्कात कपात केल्याने मोबाईल आयात करणे स्वस्त झाले असल्याने मोबाईल फोनच्या किंमती कमी होणार आहेत. केवळ मोबाईल हॅंडसेट आणि चार्जरच नाही तर मोबाईल PCBA वर देखील ( BCD ) बेसिक कस्टम ड्यूटी घटवून 15 टक्के करण्यात आली आहे.

BCD तील बदलाने फायदा

यंदाच्या जानेवारी 2024 मध्ये केंद्र सरकारने मोबाइल फोन निर्मितीसंदर्भातील पार्टसवर देखील आयात शुल्क घटवून 15 टक्क्यांवरुन 10 टक्के केले होते. दुसऱ्या देशातून डिव्हाईस किंवा कंपोनंट्स आयात केल्यानंतर मोबाइल फोन तार करणाऱ्यांना कंपन्यांना बेसिक कस्टम ड्यूटीचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे.

आधी मोबाईलचे पार्ट परदेशातून आयात करताना कंपन्यांना जास्त टॅक्स भरावा लागत होता. त्यामुळे मोबाईल फोनची किंमती वाढल्या होत्या. कस्टम ड्यूटी कमी करण्याचा फायदा घेतल्याने कंपन्यांना आता कमी टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे मोबाईल फोनची किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे मोबाईल फोन घेणाऱ्यांना या करकपातीचा फायदा होणार आहे.

Non Stop LIVE Update
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.