ऑनलाईन मिळत असलेलं ऑक्सिजनचं किट किती फायदेशीर? देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरचं उत्तर वाचा

ई-कॉमर्स संकेतस्थळांवर विकण्यात येणारे ऑक्सिजन सिलेंडर्स फारसे कामाचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. | Oxygen Randeep Guleria

ऑनलाईन मिळत असलेलं ऑक्सिजनचं किट किती फायदेशीर? देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरचं उत्तर वाचा
देशात अवघ्या 10 ते 15 टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 2:52 PM

नवी दिल्ली: सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. महाराष्ट्रात विशेषत: ऑक्सिजन (Oxygen) आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. यापैकी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची समस्या काहीप्रमाणात दूर झाली आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची वाढत्या ऑक्सिजनची गरज कशी भागवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (AIIMS director Randeep Guleria on treating Covid 19 at home with the help of oxygen cylinder )

या पार्श्वभूमीवर सध्या अनेक लोकांनी घाबरून आपल्या घरात लहान ऑक्सिजन सिलेंडर्स ठेवायला सुरुवात केली आहे. ई-कॉमर्स वेबसाईटसवर या ऑक्सिजन सिलेंडर्सची सध्या जोरदार विक्री सुरु आहे. अनेकजण मिळेल त्या किंमतीत हे सिलेंडर्स विकत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळांवर विकण्यात येणारे ऑक्सिजन सिलेंडर्स फारसे कामाचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घरगुती ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन फायदा का नाही?

घरात ऑक्सिजन सिलेंडर ठेवून फारसा फायदा होणार नाही, असे स्पष्ट मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘आज तक’शी बोलताना मांडले. कोरोना झाल्यानंतर तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागते तेव्हा ती केवळ 10 ते 15 मिनिटांपुरती नसते. त्यानंतर तुम्ही लगेच बरे होता असेही नसते.

तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यास तुम्हाला रुग्णालयातच उपचार घेण्याची गरज आहे. कारण रुग्णालयातच तुमच्या ऑक्सिजनची पातळीवर सतत देखरेख ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे तुम्ही घरी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उपचार सुरु केले तरी त्याचा विशेष फायदा होणार नाही. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर घरी असेल तर आपण कोरोनातून बरे होऊ, हा समज योग्य नाही. तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा खाली गेल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. ही पातळी 90 पेक्षा खाली गेल्यास तात्काळ रुग्णालयात भरती व्हावे, असा सल्ला डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला.

संबंधित बातम्या:

‘केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?’

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

‘राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाहीत, भाजपच्या नेत्यांवर गुन्हा करा’

(AIIMS director Randeep Guleria on treating Covid 19 at home with the help of oxygen cylinder )

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.