Tomato Price : संधीचं सोनं! या देशाकडून स्वस्तात टोमॅटोची खरेदी, भारतात मोठी कमाई

Tomato Price : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 120 रुपये ते 160 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. काही भागात तर चांगल्या टोमॅटोला यापेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. त्याचाच फायदा भारतातील काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर शेजारील देशाची अशी चांदी होत आहे.

Tomato Price : संधीचं सोनं! या देशाकडून स्वस्तात टोमॅटोची खरेदी, भारतात मोठी कमाई
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 2:37 PM

नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे भाव (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 120 रुपये ते 160 रुपये किलो भावाने विक्री होत आहे. काही भागात तर चांगल्या टोमॅटोला यापेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. हा दर 200 रुपयांपेक्षा अधिक आहे. काही व्यापाऱ्यांनी या संधीचं सोनं केलं आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहारमधील काही व्यापाऱ्यांनी त्यावर चांगला पर्याय शोधला आहे. स्वस्तात टोमॅटो खरेदी करुन ते उत्तर भारतात महागड्या दराने त्याची विक्री करत आहे. टोमॅटोच्या बाजारातील अभावाचा फायदा भारतातील काही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर शेजारील देशाची अशी चांदी होत आहे.

असा केला जुगाड गेल्या महिनाभरापासून देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी टोमॅटो शंभर तर कुठे दोनेशेच्या घरात मिळत आहे. याचा काही व्यापाऱ्यांनी फायदा उचलला आहे. त्यांनी नेपाळमधून स्वस्तात टोमॅटोची खरेदी करुन त्याची विक्री उत्तर भारतात सुरु केली आहे. नेपाळची सीमा जवळ असल्याने भारतीय व्यापारी या ठिकाणी जाऊन स्वस्तात टोमॅटोची खरेदी करत आहेत. टोमॅटोच नाही तर इतर भाजीपाला पण स्वस्त असल्याने त्याचा फायदा होत आहे.

किंमती अगदी स्वस्त सीमाभागात, धारचूला, बनबसा येथील लोक आणि आजूबाजूचे व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी नेपाळमध्ये जात आहेत. या ठिकाणी किंमती अगदी स्वस्त आहेत. नेपाळमध्ये काही ठिकाणी टोमॅटो 25 ते 30 रुपये किलो तर काही ठिकाणी 100 रुपये ते 110 रुपये नेपाळी रुपये म्हणजे 62 ते 69 भारतीय रुपये अशा भावाने मिळत आहेत. भारतात हेच टोमॅटो दुप्पट किंमतीला विक्री करुन डबल नफा कमावल्या जात आहे.

हे सुद्धा वाचा

नेपाळमध्ये जोरदार उत्पादन उत्तर भारतात मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पण नेपाळमध्ये सुरुवातीचा पाऊस जोरदार झाल्याने पिकांचे चांगले उत्पन्न झाले आहे. भारतीय बाजारातील परिस्थितीचा अंदाज आल्याने नेपाळच्या काही व्यापाऱ्यांनी भारतात मालाची विक्री सुरु केली आहे.

रोज 5 टन टोमॅटोची निर्यात भारतात टोमॅटोची मागणी वाढताच नेपाळमधून रोज 5 टन टोमॅटोची निर्यात करण्यात येत आहे. नेपाळमध्ये यावेळी टोमॅटोचे उत्पन्न जास्त आहे. तसेच फुलकोबी आणि पालक यांचे उत्पन्न पण जास्त आहे. त्यामुळे उत्तर भारताला आता नेपाळच भाजीपाला पुरविणार असेच सध्याचे चित्र आहे.

नेपाळचा मोठा फायदा नेपाळ सरकारने गेल्या काही वर्षांपासून कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी प्रत्येक गावात शेतकरी मित्र व्हॉट्सअप ग्रूप तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रत्येक गावात बी-बियाणे, खते, कीटकनाशकं, द्रव्य, नैसर्गिक शेतीसंबंधीची सामुग्री गावा-गावात पोहचविण्यात येत आहे. तसेच उत्पादन इतर देशांमध्ये विक्री करण्यासाठीचे काय निकष आहेत, याविषयीचे प्रशिक्षण, शिबिर घेण्यात येत आहेत. त्याचा नेपाळला यंदा चांगलाच फायदा झाला.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.