‘कोरोनामुळे पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही’, फारुक अब्दुलांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा

फारुक अब्दुल्ला यांनी रविवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं.

'कोरोनामुळे पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही', फारुक अब्दुलांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 7:52 AM

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी रविवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं. मात्र, अब्दुल्ला यांच्या या स्थितीवर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. फारुक अब्दुल्ला हे आफल्या रोखठोक आणि धडाकेबाज वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही त्यांनी अशाच एका वक्तव्यानं उपस्थितांना पोट धरुन हसायला भाग पाडलं. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मी पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही, असं वक्तव्य फारुक अब्दुल्ला यांनी केलं.(Cant even kiss my wife because of corona pandemic, Farooq Abdullah said)

फारुक अब्दुल्ला म्हणाले, ‘परिस्थितीच अशी आहे की कुणी हात मिळवताना किंवा गळाभेट घेतानाही घाबरतो आहे. इतकंच काय मी माझ्या पत्नीचं चुंबनही घेऊ शकत नाही. मनात असूनही गळाभेट घेऊ शकत नाही. मी सगळं बरोबर करतो आहे’. अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यावर तिथं उपस्थित असलेले सर्वच लोक पोट धरुन हसत सुटले. अब्दुल्ला यांच्या या वक्तव्याची एक व्हिडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा देण्याची मागणी

याच कार्यक्रमात बोलताना फारुक अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा देण्याची मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रक्त गोठवणारी थंडी आहे. अशावेळी लोकांकडे 4G इंटरनेट सेवा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलंय. पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना अब्दुल्ला यांनी कोरोना लस सफल ठरो, यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर चालताना लोकांमध्ये धार्मिक सद्भाव आणि माणुसकीचं नातं टिकवण्याचं आवाहन केलं आहे.

‘पंतप्रधानांनी स्वत: येऊन पाहावं’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की भारतात 5G इंटरनेट येत आहे. पण जम्मू-काश्मीरचे लोक 4G सेवेपासून वंचित आहेत. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: जम्मू-काश्मीरमध्ये येत आम्ही कशाप्रकारे अजूनही 2G इंटरनेट सेवेत अडकलो आहोत हे पाहावं, असं आवाहन अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदी यांना केलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा ऑगस्ट 2019 मध्ये राज्याला विशेष दर्जा बहाल केल्यानंतर बरखास्त करण्यात आली आहे. तेव्हा फक्त 2 जिल्ह्यांमध्येच 4G इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. त्यात जम्मूतील उधमपूर आणि काश्मीरमधील गांदरबल या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये 1 वर्षानंतर 4G इंटरनेट देण्यात आलं आहे. 18 जिल्ह्यांमध्ये अद्यापही 4G इंटरनेट सेवा निलंबित ठेवण्यात आली आहे.

इतर बातम्या :

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाणं आता सोप्पं, जाणून घ्या मोदींनी उद्घाटन केलेल्या 8 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक

पीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र

Cant even kiss my wife because of corona pandemic, Farooq Abdullah said

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.