भाजपातही जाणार नाही, कॅप्टन नवीन टीम तयार करणार?; पंजाब निवडणुकीत अमरिंदर सिंगांचा ‘खेला होबे’?
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, ते भाजपमध्येही जाणार नाहीत. अमरिंदर सिंग स्वत:ची पार्टी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं. (punjab congress)
चंदीगड: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, ते भाजपमध्येही जाणार नाहीत. अमरिंदर सिंग स्वत:ची पार्टी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसचे अनेक नेते आणि चरणजीतसिंग चन्नी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अमरिंदर सिंग यांच्या संपर्कात असून या सर्वांना घेऊन अमरिंदर सिंग नवी टीम तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पंजाब निवडणुकीत काँग्रेसची मोठी डोकेदुखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 दिवसात कॅप्टन अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला अधिक नुकसान होणार नाही. काँग्रेसची अधिक पडझड करण्यासाठीच अमरिंदर सिंग हे नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
चंदीगडमध्ये येऊन घोषणा
कॅप्टन सिंग हे दिल्लीत गेले होते. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर गुरुवारी ते दिल्लीतून चंदीगडमध्ये आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच काँग्रेसमध्ये राहणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
समर्थकांशी चर्चा
अमरिंदर सिंग यांनी चंदीगडमध्ये आल्यानंतर समर्थकांशी चर्चा सुरू केली आहे. त्यांनी शेतकरी नेत्यांशीही चर्चा सुरू केली आहे. या सर्वांशी चर्चा केल्यानंतरच अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे आमदार आणि सिंग समर्थक त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
सिद्धू टीम प्लेअर नाही
यावेळी नवज्योतसिंग सिद्धूंबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नवज्योतसिंग सिद्धू हे टीम प्लेअर नाहीत. पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी टीम प्लेअरची गरज असते. पंजाबमध्ये काँग्रेसची लोकप्रियता कमी होत असून आम आदमी पार्टीचा ग्राफ वाढत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. यावेळची पंजाब विधानसभा निवडणूक वेगळीच असेल. काँग्रेस आणि अकाली दल पंजाबमध्ये आहेच. पण आता आम आदमी पार्टीचाही ग्राफ वाढत चालल्याने आपचं आव्हानही असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून शहा, डोभाल यांना भेटलो
मी पंजाबचा मुख्यमंत्री नसेलही, पण पंजाब आजही माझेच आहे. म्हणूनच मी अमित शहा आणि केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली होती, असं त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 01 October 2021 https://t.co/S8a9UYbeT5 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
संबंधित बातम्या:
उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले
(Capt Amarinder Singh may float new party in weeks, dozen Punjab Congress leaders in touch)