Capt. Amrinder Singh : भाजपमध्ये प्रवेश केल्यास अमरिंदर सिंग यांना भाजपकडून केंद्रीय मंत्रिपदाचं गिफ्ट?

अमरिंदर सिंग यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. नवी दिल्लीतील शाह यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय. या भेटीनंतर आता अमरिंदर सिंग यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरिंदर सिंग यांना भाजपकडून मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Capt. Amrinder Singh : भाजपमध्ये प्रवेश केल्यास अमरिंदर सिंग यांना भाजपकडून केंद्रीय मंत्रिपदाचं गिफ्ट?
अमित शाह, कॅपट्न अमरिंदर सिंग
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 6:58 PM

नवी दिल्ली : पंजाबमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची मालिका सुरुच आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. नवी दिल्लीतील शाह यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय. या भेटीनंतर आता अमरिंदर सिंग यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरिंदर सिंग यांना भाजपकडून मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Capt Amarinder Singh meets BJP leader Amit Shah in Delhi)

अमरिंदर सिंग यांना कृषीमंत्रीपद मिळणार?

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं होत आहे. खास करुन पंजाब आणि हरियाणातील शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना भाजपकडून केंद्रीय कृषी मंत्रीपद दिलं जाऊ शकतं, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. कृषी कायद्याला होत असलेला विरोध ही भाजपची डोकेदुखी बनलेली आहे. त्यावरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचं काम काँग्रेस आणि विरोधकांकडून होत आहे. अशावेळी भाजप अमरिंदर सिंग यांच्या माध्यमातून मोठी खेळी करण्याच्या विचारात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये निराश

आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर आपला म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले होते की, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचं जे धोरण राहिलं आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अमानित झाल्यासारखं वाटतं असंही ते म्हणाले होते. त्याच्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

काँग्रेस प्रवक्त्यांनी दिलं होतं उत्तर

अमरिंदर सिंह यांच्या वक्तव्यानंतर, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्याल उत्तर दिलं होतं. त्या म्हणाला, अमरिंदर सिंह यांचं वक्तव्य त्यांच्या पदाला शोभत नाही, मात्र ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळेच शक्यता आहे की त्यांनी हे वक्तव्य रागात केलेलं असावं. पुढे त्या म्हणाल्या, ” ते माझ्या वडिलांच्या वयाचे असतील, वृद्ध लोकांना राग लवकर येतो आणि जास्त प्रमाणात असतो. रागात ते खूपकाही बोलून जातात, त्यांचा राग, त्यांचं वय, त्यांच्या अनुभवाचा आम्ही आदर करतो, मला वाटतं की ते याबद्दल नक्की परत विचार करतील”

इतर बातम्या :

राजीनामा मागं घेण्यासाठी सिद्धूंच्या 3 अटी, हायकमांडची कडक भूमिका कायम, पंजाबमध्ये आता पुढं काय होणार?

नाराज कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर, दिल्लीत नड्डा, शहांना भेटण्याची शक्यता, पंजाब काँग्रेसला मोठा झटका लागणार?

Capt Amarinder Singh meets BJP leader Amit Shah in Delhi

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.