VIDEO: पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचे थैमान, लोकांच्या कार पाण्यात बुडाल्या
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत | yaas cyclone
कोलकाता: यास चक्रीवादळाच्या लँडफॉलला सुरुवात झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. (Cars drown in West bengal heavy rain due to yaas cyclone)
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या मंत्रालयात ठाण मांडून बसल्या आहेत. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. (Cars drown in West bengal heavy rain due to yaas cyclone)