15 हजार किलोमीटरवरील मासे नदीत सापडले, शेतकऱ्यांना फुटला घाम, कारण ?
ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने या नदीच्या किनाऱ्यावर या माशांना पाहायला गर्दी जमली आहे, स्थानिकांनी इतक्या दूरवरील परदेशी मासळी येथे कशी आली हा प्रश्न पडला आहे.

हल्ली निसर्गात अनेक चमत्कार घडत आहेत. नेपाळला लागून असलेल्या बिहार राज्यातील एका नदीत परदेशी जातीचे मासे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बिहारच्या नदीत मासेमारी करताना शेतकऱ्यांच्या जाळ्यात विचित्र जातीचे मासे आढळले, हे मासे येथील नाहीत असा त्यांना संशय आला. त्यांनी हे मासे कुठले आहेत याचा शोध घेतला तर धक्कादायक माहीती उघड झाली आहे. त्यांनी तज्ज्ञांना हे मासे दाखवले तेव्हा त्यांना कळले की हे मासे कॅटफिश असून ते १५ हजार ७३१ किलोमीटर अंतरावरील एमाझॉन येथील रेनफॉरेस्ट येथील असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
इतक्यादूर अंतरावरील एमेझॉन जंगलातील नदीचे हे मासे येथे कसे आले त्यामुळे बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील मासेमार धास्तावले आहेत. या कारण या शेतकऱ्यांच्या जाळ्यात सापडलेले मासे केवळ दक्षिण अमेरिकेजवळील एमेझॉनच्या वर्षा जंगलातच आढळतात. या माशांचे नाव कॅट फिश असून हे मासे शिकारी मासे असून ते इतर माशांचा फडशा पाडतात हे उघड असल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण जर जाळ्यामध्ये केवळ पाच कॅटफिस सापडले असले तरी यांची संख्या अधिक असण्यची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.




माशांच्या जीवनचक्राला धोका
भारत आणि नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारराज्याच्या कडेला असलेल्या अरुणा नदीत अशा प्रकारचे शिकारी कॅटफिश मासे सापडल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. या माशांचा विचित्र मांजरीसारखा चेहरा आणि मिशांमुळे त्यांना कॅटफिश हे नाव पडलेले आहे. कारण या माशांची जात केवळ दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या वर्षांजगलातच आढळत असते. या माशांच्या उपद्रवामुळे नदीतील इतर माशांची शिकार होणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या कॅटफिशमुळे स्थानिक माशांच्या जातींना धोका निर्माण होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.