CBI Raids : सीबीआयकडून चिदंबरम पिता-पुत्रांच्या घरावर छापा, कार्ती चिदंबरमची खोचक पोस्ट चर्चेत
हे प्रकरण परदेशात पैसे पाठवण्याशी संबंधित आहे. 2010 ते 2014 दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांच्यावर आहे. प्राथमिक तपासानंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
नवी दिल्ली – आज माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांचा मुलगा कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीबीआयने (CBI) कार्ती चिदंबरम यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. हा छापा आधीच सुरू असलेल्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत सीबीआयने एकूण 9 ठिकाणी छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडू आणि मुंबईत तीन ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. त्याचबरोबर पंजाब, कर्नाटक आणि ओडिशामध्ये छापे टाकण्यात आले आहेत. एका प्रकल्पासाठी चिनी कामगारांना व्हिसा मिळवून देण्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती आहे.
After so many raids, I’m sure the #CBI knows how many dhotis #Chidambaram has!
हे सुद्धा वाचा— RadhakrishnanRK (@RKRadhakrishn) May 17, 2022
कार्ती चिदंबरम यांचं छापेमारी संदर्भात ट्विट
कार्ती चिदंबरम यांनी छापेमारी संदर्भात एक ट्विट देखील केले आहे. त्याने ट्विटमध्ये असे कितीवेळा घडले ते मी मोजायला विसरलो आहे असा आशय त्याने ट्विटमध्ये लिहिला आहे. हा एक पध्दतीचा विक्रम आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सध्या किर्ती घरी नाहीत, तर ते लंडनला गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण परदेशात पैसे पाठवण्याशी संबंधित आहे. 2010 ते 2014 दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांच्यावर आहे. प्राथमिक तपासानंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
Tamil Nadu | Police presence at Congress leader P Chidambaram’s residence in Chennai as CBI searches multiple locations of his son Karti Chidambaram in connection with an ongoing case pic.twitter.com/LQIv9LdCHX
— ANI (@ANI) May 17, 2022
सीबीआयचे अधिकारी गेटवरून उडी मारली अन् आत घुसले
सीबीआय तामिळनाडूतील तीन, मुंबईतील तीन, पंजाबमधील एक, कर्नाटकातील एक आणि ओडिशातील एका अशा नऊ ठिकाणी शोध घेत आहे. संबंधित कारवाईमध्ये कार्यालये आणि घरांचा समावेश आहे. दिल्लीतील पी. चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद असल्याने सीबीआयचे अधिकारी गेटवरून उडी मारून आत घरात शिरले.
कार्ती चिदंबरम यांच्यावर कथित विदेशी गुंतवणुकीप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. सकाळी आठ वाजता छापेमारी सुरू झाली आहे.