Ceasefire Violation : Loc वर पाकिस्तानच कारस्थान फेल, भारतीय सैन्याकडून सणसणीत प्रत्युत्तर
Ceasefire Violation : पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LOC) पुन्हा एकदा शस्त्रसंधीच उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. कुठे ही घटना घडलीय? दोन्ही देशांमध्ये काय करार झाला होता? जाणून घ्या.

पाकिस्तानने पुन्हा एकदा LOC वर सीजफायर म्हणजे शस्त्रसंधीच उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला जशास तस सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच मोठ नुकसान झालं आहे. भारतीय सैन्याने अधिकृतरित्या पाकिस्तान सैन्याकडून सीजफायरच उल्लंघन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात कृष्णा घाटी सेक्टरमध्ये अशीच फायरिंगची घटना घडली होती. पुंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता.
पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, या कारवाईत पाकिस्तानकडून येणारे चार ते पाच घुसखोर मारले गेले होते. याची अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही. या कारवाईत आपलं काहीही नुकसान झालेलं नाही, असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं. दिवसभर थांबून-थांबून गोळीबार सुरु होता. भारतीय सैन्य पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.
जशास तसं प्रत्युत्तर
मागच्या दोन महिन्यात नियंत्रण रेषेवर खासकरुन दक्षिण पीर पंजाल क्षेत्रात फायरिंगच्या घटना वाढल्या आहेत. यात स्नायपिंग, गोळीबार आणि पाकिस्तान बॉर्डर Action टीमकडून हल्ले वाढले आहेत. भारतीय जवान या घटनांना जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत, असं सैन्यातील सूत्रांनी सांगितलं. भारतीय सैन्यानुसार, जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिसातानकडून अनेकदा झालेला घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे.
भारताने हा मुद्दा पाकिस्तान समक्ष उपस्थित केला
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानी सैनिकांनी छोट्या शस्त्रांनी फायरिंग केली. स्फोटक साहित्याचा वापर केला. भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने हा मुद्दा पाकिस्तान समक्ष उपस्थित केला, पण त्यांच्याकडून सीजनफायरच उल्लंघन कायम आहे.
पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा हा पुरावा
भारत आणि पाकिस्तानमध्ये चार वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2021मध्ये LOC वर शस्त्रसंधीचा करार झाला होता. आता चार वर्षांनी फेब्रुवारीपासूनच पाकिस्तानने सीजनफायरच उल्लंघन सुरु केलय. दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशनमध्ये (DGMO) हा करार झाला होता. सीमेवर शांतता आणि स्थिरता ठेवणं हा त्यामागचा उद्देश होता. सीजफायर उल्लंघन खासकरुन पूँछ भागात होत आहे. पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा हा पुरावा आहे.