Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 8:22 AM

नवी दिल्ली :  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा देखील अशाच एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांचे देखील अपघाती निधन झाल्याने सरकारने रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार आता चारचाकीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली आहे.

काय आहेत नवे नियम?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकार रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबतच अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते बदल देखील करण्यात येणार आहेत.

वाहन कंपन्यांची दुटप्पी भूमिका

पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटलं आहे की, अनेकदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. जेव्हा या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्यामध्ये सहा एअरबॅग असतात. मात्र जेव्हा हेच उत्पादन देशात विक्रीसाठी तयार केले जाते तेव्हा वाहनामध्ये चारच एअरबॅग असतात.

हे सुद्धा वाचा

वाहन कंपन्यांकडून चुकीचा दावा

याबाबत जेव्हा कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी खर्च वाढत असल्याचे कारण सांगितले, पण मला वाटत हा कंपन्यांचा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 900 रुपये इतकाच खर्च येतो. त्यामुळेच आता प्रत्येक चारचाकी वाहनात सहा एअरबॅगची सक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.