AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका सांगताना कोणाताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही, असं मत व्यक्त केलं आहे.

कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 11:56 PM

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका सांगताना कोणाताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही, असं मत व्यक्त केलं आहे (Health Minister Harshavardhan on Corona and Festivals). ते संडे संवाद कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, “आपण सण-उत्सवांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी पाळण्याकडे दुर्लक्ष केलं तर कोरोना पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रुप धारण करु शकतो. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही याला माझी काळजी समजा अथवा माझा सल्ला मात्र हे सत्य आहे.”

डॉ. हर्षवर्धन यांनी नागरिकांना पाश्चात्य संस्कृतीच्या पलिकडे जाऊन भारतीय परंपरेचं अनुकरण करण्यास सांगितलं. ते म्हणाले, “कोणत्याही धर्मात कोणताही धर्मगुरु लोकांना जीव धोक्यात घालून सण-उत्सव साजरा करण्यास सांगत नाही. कोणताही देव त्यांच्या पुजेअर्चेसाठी जीव धोक्यात टाकण्यास सांगत नाही किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन पूजा करण्यास सांगत नाही.”

“तुम्ही तुमच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेनुसार कोठे पुजेसाठी जाणार असाल तर एकमेकांपासून किमान शारीरिक अंतर ठेवणं, मास्क घालणं आणि इतरांनाही प्रेरित करावं अशी माझी हात जाडून विनंती आहे. देशाचा आरोग्यमंत्री म्हणून देशातील नागरिकांच्या जीवाची रक्षा करणं हाच माझा पहिला धर्म आहे म्हणूनच मी तुम्हाला हे सांगत आहे,” असंही हर्षवर्धन यांनी नमूद केलं.

आधी वयोवृद्धांऐवजी तरुणांना कोरोना लस देण्याच्या योजनेला हर्षवर्धन यांनी फेटाळून लावलं. अशी कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ही खोटी बातमी असल्याचं म्हटलं. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सण-उत्सवांबाबत काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

भारतात आतापर्यंत एकूण 70 लाख 53 हजार 806 कोरोना रुग्ण झाले आहेत. यातील दिलासादायक बातमी म्हणजे यापैकी एकूण 60 लाख 77 हजार 976 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 8 लाख 67 हजार 496 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे 1 लाख 08 हजार 334 वर पोहचला आहे.

संबंधित बातम्या :

Dharavi Corona | मुंबईला आणखी एक प्रशस्तीपत्र, WHO पाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेकडून कौतुक

Central Health Minister Harshavardhan on Festivals and Corona infection

पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.