कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी भारताची लढाई, केंद्र सरकारच्या गाईलाईन्स वाचल्या का?

केंद्र सरकारनं कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. (Health Ministry issued guidelines)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी भारताची लढाई, केंद्र सरकारच्या गाईलाईन्स वाचल्या का?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 6:56 PM

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. कोरोना विषाणूमुळं जगात 17 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आल्यानं संकट आणखी वाढलं आहे. नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर भारतानं ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. तर, काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं आहे. भारत सरकार कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत सतर्क झाले आहे. केंद्र सरकारनं कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. (Central Health Ministry issued guidelines on the wake of new corona virus strain)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

मार्गदर्शक सूचना भाग 1

  1. यूकेमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले आहे.
  2. जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांना विलगीकरण कक्षात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या नमुन्याचे जिनोमिक सिक्वेंन्सिंग करण्यासाठी नॅशनल इनस्टिट्युट ऑफ वायरोलॉजी, पुणे येथे पाठवण्यात येईल.
  3. पॉझिटिव्ह व्यक्ती पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आणि त्याच्या नमुन्यामध्ये नवा वेरियंट न आढळल्यास प्रचलित पद्धतीनं कोरोना रुग्णावर उपचार करण्यात येतील.
  4. जिनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये नवीन वेरियंट आढळ्यास त्यावर प्रचलित पद्धतीनं उपचार केला जाईल. मात्र, त्या व्यक्तीची 14 दिवसांनंतर टेस्ट केली जाणार आहे. 14 व्या दिवसांनंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यानंतर सलग दोन चाचण्या निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत कोरोना चाचणी केली जाणार आहे.
  5. आरटीपीसीआर टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या घरी क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
  6. विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांना प्रवासापूर्वीच या सर्व मार्गदर्शक सूचनांची माहिती द्यावी लागणार आहे. प्रवासादरम्यान याची घोषणा केली जाईल आणि विमानतळावर वेटिंग रुममध्ये या गाईडलाईन लावाव्या लागणार आहेत. (Central Health Ministry issued guidelines on the wake of new corona virus strain)

मार्गदर्शक सूचना भाग 2

  1.  21 ते 23 डिसेंबर दरम्यान यूकेमधून आलेल्या आणि आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांना एका वेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. आसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणं कोरोना चाचणी केली जाईल.
  2. कोरोना संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीच्या 3 सीट पुढे आणि 3 सीट मागे बसले असले असतील ते ग्राह्य धरले जातील. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या केबिन क्रूच्या सदस्यांची देखील माहिती घेतली जाणार आहे.
  3. 21 ते 23 डिसेंबर दरम्यान यूकेमधून आलेल्या आणि आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व राज्यांना देण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे प्रवाशांना होम क्वारंटाईन केले जाईल. आसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणं कोरोना चाचणी केली जाईल.
  4. 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान जे प्रवासी भारतात आले आहेत त्यांची माहिती जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांना दिली जाईल. जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशांना सूचना देणे आवश्यक आहे. प्रवाशांमध्ये असे लक्षण आढळल्यास त्यांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यामध्ये नवे वेरियंट आढळतात हे पाहावे लागणार आहे. (Central Health Ministry issued guidelines on the wake of new corona virus strain)

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती दिली जाणार

  1. 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान भारतात आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांना दिली जाईल. यामाहितीच्या आधारे पुढील 14 दिवस त्या प्रवाशांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली जाईल.
  2. जे प्रवासी नियंत्रणाखाली असतील त्यांच्या आरोग्याबद्दल जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांकडून पुढील 28 दिवस माहिती घेतली जाईल.
  3. 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत भारतात आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विमानतळावर केलेली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांना पुन्हा चाचणी करावी लागेल. यावेळी त्यांना कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचा रिपोर्ट सोबत न्यावा लागेल.
  4. एखादा प्रवासी विमानतळावर उतरुन त्या शहरातून दुसरीकडे गेला असल्यास त्याबाबत राज्य आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कळवण्यात येणार आहे. या प्रवाशांची
  5. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना वेगळ्या विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
  6. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या नमुन्यामध्ये नवीन वेरियंट आढळ्यास त्यावर प्रचलित पद्धतीनं उपचार केला जाईल. मात्र, त्या व्यक्तीची 14 दिवसांनंतर टेस्ट केली जाणार आहे. 14 व्या दिवसांनंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यानंतर सलग दोन चाचण्या निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत कोरोना चाचणी केली जाणार आहे.
  7. एखादा प्रवासी ट्रेस होत नसेल तरी जिल्हा नियंत्रण अधिकारी आणि केंद्रीय नियंत्रण अधिकाऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?

Breaking | ब्रिटनमध्ये आढळली कोरोनाची नवी प्रजाती, डॉ. संग्राम पाटील, थेट लंडनहून LIVE

(Central Health Ministry issued guidelines on the wake of new corona virus strain)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.