बाप्पा पावला! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आणखी 38 फेऱ्या; रेल्वे फेऱ्यांची संख्या 150वर

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने आणखी 38 स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Central Railway to run 38 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

बाप्पा पावला! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आणखी 38 फेऱ्या; रेल्वे फेऱ्यांची संख्या 150वर
कोकण रेल्वे
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 4:40 PM

नवी दिल्ली: गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने आणखी 38 स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणपती स्पेशल ट्रेनच्या एकूण 150 ट्रिप्स सोडण्यात येणार आहे. सर्वप्रथम 72 त्यानंतर आणखी 40 ट्रिप्स आणि आता 38 फेऱ्या वाढविण्यात येत आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली. (Central Railway to run 38 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या आता एकूण 150 फेऱ्या होणार आहेत. यात रेल्वेने आधीच 72 फेऱ्या, त्यानंतर अतिरिक्त ट्रेनच्या 40 फेऱ्या आणि सध्य परिस्थिती पाहून पश्चिम रेल्वेने आता 38 फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसे नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण येऊ देणार नाही. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्रमध्ये ज्या काही अडी-अडचणी असतील, त्यांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे दानवे यांनी सांगितले. या पुढे देखील वेटींग लिस्ट वाढली तर प्रवाशांसाठी अधिक फेऱ्या वाढवण्यात येतील. कुठल्याही प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शेलारांची दानवेंकडे मागणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी गणेशोत्सवासाठी अधिक गाड्या सोडण्याची मागणी केली होती. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी शेलार यांनी केली होती. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. (Central Railway to run 38 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

संबंधित बातम्या:

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे

संघ इतका का बदलतोय? त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिलं पाहिजे: संजय राऊत

(Central Railway to run 38 Ganpati special trains between Mumbai and Konkan)

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.