चंदीगड ‘एमएमएस कांड’; आता व्हॉट्सॲप ग्रुपही पोलिसांच्या रडारवर…

चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होत आहेत. यामधील आता तिघांना ताब्यात घेऊन पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात झाली आहे.

चंदीगड 'एमएमएस कांड'; आता व्हॉट्सॲप ग्रुपही पोलिसांच्या रडारवर...
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 1:09 PM

चंदीगडः मोहालीतील चंदीगड विद्यापीठातील अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणातील तीन आरोपींनी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणातील 4 मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून त्यांची बारकाईने आता तपासणी केली जात आहे. या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी आणि व्हिडीओ कोणत्या नंबरवर पाठवले होते त्याचीह माहिती गोळा केली जात आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तिघांच्या फोनवर काही व्हॉट्सॲप ग्रुपही सापडले आहेत.

आता पंजाब पोलिसांच्या रडारवर आहेत. या सर्व क्रमांकांची यादी तयार करण्यात आली असून या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत का, त्याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. जर या ग्रुप्समधून डेटा हटवला गेला असेल, तर तो फॉरेन्सिक टीमद्वारे पुनर्प्राप्त केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

मोहालीच्या खरार न्यायालयाने या प्रकरणातील विद्यार्थिनीसह तीन आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी सनी मेहता हा विद्यार्थिनीचा प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे.

तो व्हिडीओ बनवून तिला पाठवत होता. तो सध्या बेकरीचे काम करत होता. तर दुसरा आरोपी रंकज वर्मा हा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करतो. हे दोन्हीही आरोपी हिमाचल प्रदेशातील रोहरू येथील आहेत.

विद्यापीठातील आरोपी तरुणी सनीला जे अश्लील व्हिडीओ पाठवत होती, ते व्हिडीओ सनी रंकज वर्माला पाठवत होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये चेष्टा मस्करीही केली जात होती. यामधूनच हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे.

विद्यार्थिनींचे हे व्हिडीओ कोणत्याही साईट्सवर अपलोड करुन पैसे कमवण्यासाठी त्याचा वापर केला जात होता का याचाही शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील हे दोघेही आरोपी व्यवसाय करत असले तरी ते मोकळा वेळ मोबाईलवर घालवत होते.

त्यामुळे हे व्हिडीओ त्यांनी किती लोकांना पाठवले आहेत, त्याची चौकशी सुरु असून त्याचा डेटाही शोधला जात आहे. त्यामुळे हे व्हिडीओ या दोघांकडे कधीपासून आले आहेत, आणि त्यांनी त्याचा कसा वापर केला याचीही चौकशी केली जात आहे.

सनीने ज्या मुलीकडून हे व्हिडीओ घेतले आहेत, तिला ब्लॅकमेल करुन तो व्हिडीओ तयार करुन घेत होता का याचाही पोलीस तपास करत आहेत. तर या प्रकरणात जो दुसरा व्हिडीओ मिळाला आहे तो कोणत्या मुलीचा व्हिडीओ आहे, तो कुठे शूट केला आहे तेही तपासले जाणार आहे.

आरोपी तरुणीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हे सगळे व्हिडीओ तिनेच पाठवले असल्याचे सांगत ते व्हिडीओ आपलेच असल्याचे पोलिसांना तिने सांगितले आहे. त्यानंतर मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर इतर विद्यार्थिनींचेही अश्लील व्हिडिओही पाठवले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत आणखी काय काय खुलासा होणार हे तपासानंतरच कळणार असल्याचे सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.