हैदराबाद: विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने तेलुगु देसम पार्टीचे नेते एन. चंद्राबाबू नायडू प्रचंड व्यथित झाले. पत्रकार परिषद सुरू असतानाच ते ढसढसा रडले. यावेळी त्यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही, असा पणच त्यांनी केला.
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांकडून चंद्राबाबू नायडूंबद्दल सातत्याने अपशब्द वापरले जात आहेत. त्यात त्यांच्या पत्नीबद्दलही अनुद्गार काढण्यात आल्याने चंद्राबाबू प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही, तोपर्यंत विधानसभेत पायच ठेवणार नसल्याची शपथ घेतली.
या सर्व प्रकरणावर भाष्य करण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पत्नीबाबत काढलेल्या अपशब्दांबाबत बोलायला सुरुवात केली. त्याबाबत बोलत असताना चंद्राबाबूंना अचानक भावना अनावर झाल्या आणि ते अक्षरश: रडायला लागले. मी गेल्या चार दशकापासून भारतीय राजकारणात आहे. पण माझ्याशी कोणीच एवढे अपमानास्पद वागले नाही, असं त्यांनी सांगितलं.
हिवाळी अधिवेशनात महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू होती. यावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी नायडू आणि त्यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. त्यावर नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अडिच वर्षापासून मी हा अपमान सहन करत आहे. आज तर त्यांनी माझ्या पत्नीलाच त्यांनी टार्गेट केलं आहे. मी नेहमीच सन्मानासाठी आणि सन्मानाने राहिलो. मात्र, आता मी अधिक सहन करू शकत नाही, असं ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी माझ्या पत्नीवर निशाणा साधला आहे. मी माझ्या कुटुंबाचं चारित्र्य हनन सहन करू शकत नाही, असंही ते म्हणाले. नायडूंची पत्नी एनटी रामाराव यांची मुलगी आहे. एनटी रामाराव यांनी टीडीपीची स्थापना केली होती. ते दोनदा सत्तेत आले होते.
25 मार्च 1989मध्ये तामिळनाडूच्या विधानसभेतही अशीच घटना घडली होती. एआयएडीएमके नेत्या जयललिता यांचा सभागृहात अपमान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनीही जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत विधानसभेत जाणार नसल्याची शपथ घेतली होती. जयललिता यांचा हा राजकीय ड्रामा असल्याची टीकाही त्यावेली झाली होती. मात्र, त्यानंतर त्या सत्तेत आल्या होत्या.
#WATCH | Former Andhra Pradesh CM & TDP chief Chandrababu Naidu breaks down at PC in Amaravati
He likened the Assembly to ‘Kaurava Sabha’ & decided to boycott it till 2024 in protest against ‘ugly character assassinations’ by YSRCP ministers & MLAs, says TDP in a statement pic.twitter.com/CKmuuG1lwy
— ANI (@ANI) November 19, 2021
संबंधित बातम्या:
Farm Laws : पंतप्रधान मोदींनी त्या 700 शेतकरी कुटुंबीयांची माफी मागावी- संजय राऊत
Nashik| आणखी एका ST कर्मचाऱ्याची आत्महत्या; कमी पगारामुळे उचलले टोकाचे पाऊल!