Chandrayaan-3 update | रॉकेट ते लँडरपर्यंत, चौकडीची कमाल, चांद्रयान-3 मिशनचे ‘हे’ चार हिरो माहित आहेत का?

Chandrayaan-3 update | चांद्रयान-3 मिशनचे हे चार हिरो कोण?. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) प्रमुख वैज्ञानिकांनी मिळून चांद्रयान-3 मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Chandrayaan-3 update | रॉकेट ते लँडरपर्यंत, चौकडीची कमाल, चांद्रयान-3 मिशनचे 'हे' चार हिरो माहित आहेत का?
Chandrayaan-3
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 9:30 AM

नवी दिल्ली : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून काही किलोमीटर दूर आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 च चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ लँडिंग होणार आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंगसोबत भारत इतिहास रचणार आहे. दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरेल. स्पेसक्राफ्टवर ऑर्बिट बदल आणि डिबूस्टिंगची सर्व प्रक्रिया पार पडली आहे. आता फक्त लँडिंग प्रोसेस बाकी आहे. आता चंद्रावर सुरक्षित जागेवर सॉफ्ट लँडिंग होईल.

चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्युलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा समावेश आहे. मागच्या गुरुवारी प्रॉप्लशन मॉड्युलपासून लँडर मॉड्युल वेगळं झालं. लँडर मॉड्युलने सोमवारी चंद्राच्या पुष्ठभागाचे काही फोटो पाठवले. या फोटोंच्या माध्यमातून चंद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी जागा शोधली जाईल. भारताच्या या चांद्रयान-3 मिशनमध्ये चौघांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

कोणी चांद्रयान-3 मिशन तयार केलं?

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) प्रमुख वैज्ञानिकांनी मिळून चांद्रयान-3 मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ आणि त्यांच्या टीमचा सहभाग आहे. चांद्रयान-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (VSSC) डायरेक्टर सुद्धा या टीमचा भाग आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

एस सोमनाथ : मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात एस सोमनाथ यांनी इस्रोच्या चेअरमन पदाची जबाबदारी संभाळली. भारताच्या मून मिशनमध्ये सहभागी असलेले ते प्रमुख व्यक्ती आहेत. इस्रोचे चेअरमन बनण्याआधी सोमनाथ विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे डायरेक्टरही होते. चांद्रयानशिवाय सूर्यावर पाठवल्या जाणाऱ्या आदित्य-एल 1 आणि गगनयान मिशनवरही त्यांच्या देखरेखीखाली काम चालू आहे.

पी वीरमुथुवेल : पी वीरमुथुवेल चांद्रयान-3 मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. 2019 मध्ये त्यांना चांद्रयान-3 साठी डायरेक्टर बनवण्यात आलं. वीरमुथुवेल यांनी इस्रोच्या मेन ऑफिसमध्ये ‘स्पेस इंफ्रास्ट्रक्चर प्रोग्राम ऑफिस’ येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. चांद्रयान-2 मिशनमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तामिळनाडू विल्लुपरम येथे राहणाऱ्या वीरमुथुवेल यांनी आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतलं आहे.

एस उन्नीकृष्णन नायर : विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (VSSC) डायरेक्टर पदाची जबाबदारी एस उन्नीकृष्णन नायर यांच्यावर आहे. लॉन्च व्हीकल मार्क-III रॉकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जियोसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हीकल मार्क-III ला VSSC ने तयार केलय. VSSC केरळ तिरुवनंतपुरम थुंबा येथे आहे. VSSC डायरेक्टर म्हणून उन्नीकृष्णन आणि त्यांची टीम मिशनच्या प्रमुख गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. एम शंकरन : एम शंकरन यू आर राव सॅटेलाइट सेंटरचे (URSC) डायरेक्टर आहेत. त्यांनी जून 2021 मध्ये पद संभाळलं. URSC कडे इस्रोचे सॅटलाइट बनवण्याचा अनुभव आहे. शंकरने त्या टीमला मार्गदर्शन करतायत. कम्युनिकेशन, नेविगेशन, रिमोट सेंसिंग, हवामान अंदाज आणि अन्य ग्रहांच्या शोधांसाठी सॅटलाइट बनवण्याच काम त्यांच्याकडे आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.