Chandrayaan-3 Latest Update | चांद्रभूमीवर पोहोचलेल्या लँडर, रोव्हरबद्दल ISRO कडून पहिलं टि्वट

Chandrayaan-3 Latest Update | इस्रोने टि्वट करुन काय अपडेट दिलीय?. भारताने काल इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.

Chandrayaan-3 Latest Update | चांद्रभूमीवर पोहोचलेल्या लँडर, रोव्हरबद्दल ISRO कडून पहिलं टि्वट
ISRO Tweet
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 9:41 AM

बंगळुरु : चांद्रभूमीवर बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचा तिरंगा फडकला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच (ISRO) चांद्रयान-3 मिशन यशस्वी ठरलं आहे. भारताने काल इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. अशी कामगिरी करणं बलाढ्य अमेरिका, रशिया आणि चीनला सुद्धा जमलेलं नाही. खरोखरच इस्रोच्या वैज्ञानिकांनी कमाल केलीय. तमाम भारतीयांना त्यांनी अभिमानाचा क्षण अनुभवण्याची संधी दिली आहे. आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रभूमीवर आहेत.

यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काय करतायत? त्यांची स्थिती कशी आहे? या बद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. आता स्वत: इस्रोनेच या बद्दल टि्वट करुन माहिती दिलीय.

ऊर अधिक अभिमानाने भरुन येईल

विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रज्ञान रोव्हर होता. आता प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर पडला असून त्याने संशोधन कार्य सुरु केलं आहे. या टि्वटमुळे भारतीयांचा ऊर अधिक अभिमानाने भरुन येईल. त्यातून मिशनच यश दिसून येतं.

मेड फॉर द मून

गुरुवारी सकाळी इस्रोने चांद्रयान-3 मिशनबद्दल ताज टि्वट केलय. “मेड इन इंडिया, मेड फॉर द मून चांद्रयान-3 चा रोव्हर लँडरमधून बाहेर आलाय. भारताने चंद्रावर मून वॉक सुरु केलाय. लवकरच पुढचे अपडेट्स मिळतील” असं टि्वटमध्ये म्हटलं आहे. यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर जवळपास दोन तासांनी प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर आला. गुरुवारी सकाळी रोव्हरने आपलं काम सुरु केलय. भारताने 14 जुलैला मिशन लॉन्च केलं होतं. जवळपास 40 दिवसांनी भारताच चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.