Chandrayaan 3 Update | चंद्रावर 20 सप्टेंबरला सूर्यप्रकाश, मग ISRO आज दोन दिवसांनी विक्रमला कमांड का देणार?
Chandrayaan 3 Update | ISRO च्या मिशनला आज नव्याने प्राणवायू मिळेल का?. विक्रम, प्रज्ञान आज कायमची साथ सोडणार? की पुन्हा जागे होणार? इस्रोने कमांड देण्यासाठी दोन दिवस का घेतले? या विलंबामागे कारण काय?

बंगळुरु : ISRO साठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ती वेळ आलीय. चांद्रयान-3 मिशनच भविष्य आज निश्चित होईल. हे मिशन पूर्णपणे यशस्वी ठरलय. पण भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO पुन्हा एकदा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागं करण्याचा प्रयत्न करतील. आता विक्रम आणि प्रज्ञानकडून जी काही अतिरिक्त माहिती मिळेल, ती मिशनसाठी बोनस असेल. ISRO ला आता फक्त कमांड द्यायची आहे. शिवशक्ती पॉइंटवर भारताचा लँडर आणि रोव्हर जिथे आहे, तिथे 20 सप्टेंबरलाच सूर्य प्रकाश पोहोचला आहे. आता ISRO सिग्नल पाठवेल. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आज आपल्या लँडर आणि रोव्हरला वेकअप सिग्नल पाठवेल. दोन दिवसांपासून चंद्रावर सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे आता विक्रम आणि प्रज्ञानमधील सोलार पॅनलच्या बॅट्री फुल चार्ज झाल्या असतील अशी अपेक्षा आहे.
20 सप्टेंबरला सूर्यप्रकाश झाला असला, तरी दोन दिवसांनी कमांड देण्यात येणार आहे. सगळी काही जुळून आलं, सिग्नल यशस्वीपणे पोहोचला, तर भारताला आणखी पुढचे 10-12 दिवस चंद्रावरील माहिती गोळा करता येईल. भारतासाठी ही बोनस माहिती असेल. पुढच्या मिशनसाठी त्याचा उपयोग होईल.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्रीच्यावेळी तापमान -238 डिग्री असतं. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमधील उपकरण इतकं कमी तापमान सहन करुन टिकून राहू शकतात का? ते समजेल. असं झाल्यास ती निश्चित एक मोठी बाब असेल. लँडर आणि रोव्हरसाठी ज्या कंपन्यांनी उपकरण बनवलीयत, त्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी येऊ शकते. रोव्हर आणि लँडरने इस्रोचे सिग्नल पकडले पाहिजेत. जर या सिग्नलसना प्रतिसाद मिळाला नाही, तर चांद्रयान-3 मिशन इथेच संपून जाईल. आता फोकस काय?
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले, तर ते एक मोठं यश असेल. चांद्रयान-3 मिशन पुढे जाणार की नाही? ते शुक्रवारी ठरेल, असं यूआर राव सॅटेलाइट सेंटरचे डायरेक्टर एम शंकरन यांनी सांगितलं. विक्रम आणि प्रज्ञानने आतापर्यंत जो डाटा पाठवलाय, त्यातून बरीच माहिती मिळालीय. त्यावर सतत विश्लेषण सुरु आहे. या दोन्ही मॉड्युल्सना पुन्हा जाग करण्यावर वैज्ञानिकांच लक्ष आहे.