Chandrayaan-3 | मागच्यावेळी थ्रस्टर्समुळे यानाला जास्त झटके बसले, यावेळी इस्रोने चूक सुधारताना काय केलय?
Chandrayaan-3 | चंद्रावर उतरताना यानाची गती कमी करावी लागते. त्यासाठी पाच इंजिनचा वापर करण्यात आला. पण त्यातून यानाला अपेक्षेपेक्षा जास्त धक्के एकप्रकारचे झटके बसले.
बंगळुरु : भारताच चांद्रयान-2 मिशन अगदी शेवटच्या काही मिनिटात फसलं होतं. चंद्रावर लँड होण्याआधी इस्रोचा लँडरशी संपर्क तुटला होता. त्या चुकांमधून धडा घेत इस्रोने चांद्रयान-3 मिशनमध्ये अनेक बदल केले होते. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी ही माहिती दिली. चांद्रयान-2 मध्ये नेमकं काय चुकलं? या बद्दल सविस्तर माहिती देताना सोमनाथ यांनी सांगितलं की, “चांद्रयान-2 मिशनमधील लँडरला एकूण पाच इंजिन होते. चंद्रावर उतरताना यानाची गती कमी करावी लागते. त्यासाठी या इंजिनचा वापर करण्यात आला. पण त्यातून यानाला अपेक्षेपेक्षा एकप्रकारचे जास्त झटके बसले. त्यामुळे अनेक चूका झाल्या. योग्य मार्ग पकडण्यासाठी यानाने जास्त फेऱ्या मारल्या”
यानाची फिरण्याची जी क्षमता आहे, त्यासाठीच सॉफ्टवेअर मर्यादीत होतं. 500×500 चौरस मीटरच्या लँडिंग एरियामध्ये यान जास्त गतीने खाली आलं. स्पेसक्राफ्ट उतरण्यासाठी त्यामनाने ही कमी जागा होती. चांद्रयान-2 मध्ये मुख्य मुद्दा हा होता की, परिवर्तन, बदल हाताळण्याची क्षमता फार कमी होती, असं सोमनाथ यांनी सांगितलं.
धक्क्यांमुळे अधिक वेग मिळाला
“चांद्रयान-2 मिशनमध्ये लँडरच्या सुरुवातीच्या भागाने व्यवस्थित काम केलं. पण अखेरीस अपेक्षेनुसार लँडरने काम केलं नाही आणि हार्ड लँडिंग झालं असं माजी इस्रो प्रमुख के.सिवन यांनी सांगितलं. “आम्ही जितकी अपेक्षा आणि डिझाइन केली होती, त्यापेक्षा जास्त ती पातळी फैलावली गेली. या उच्च पातळीमुळे मार्गदर्शक प्रणाली खराब झाली. यंत्रणेनं जोर कमी करण्याऐवजी तो उलट वाढला. या त्रुटी सुधारण्यासाठी मोठ्या मॅन्यूव्हर्सची गरज होती. पण यंत्रणेत मर्यादा असल्याने ती आम्हाला हव्या पद्धतीने काम करू शकत नव्हती” असं के सिवन यांनी सांगितलं.
चांद्रयान-3 च वैशिष्टय काय?
चांद्रयान-3 च वैशिष्ट्य म्हणजे अपयश कशात येऊ शकतं? त्यापासून कसा बचाव करता येईल? त्या सर्व शक्यता लक्षात घेऊन चांद्रयान-3 ची निर्मिती करण्यात आली आहे. चांद्रयान-3 मागे चांद्रयान-2 चा अभ्यास आहे.
लँडिंग एरियामध्ये काय बदल केले?
चांद्रयान-3 मिशनमध्ये चंद्रावरील लँडिंग एरिया वाढवण्यात आला आहे. 4 किमी x 2.5 किती असा एरिया आहे. परिस्थिती बिघडली, तर लँडरला लँडिंगसाठी जास्त जागा मिळावी, हा त्यामागे उद्देश आहे. ऐन मोक्याच्या क्षणी यानाला लँडिंगची जागा बदलावी लागली, जास्त प्रवास करावा लागला, तर त्यासाठी इंधनही जास्त ठेवण्यात आलय. लँडिंग एरियामध्ये 30 सेंटीमीटरपेक्षा मोठी वस्तू असेल तर काय?
चांद्रयान-3 ला लँडिंगच्यावेळी फोटो घेतल्यानतंर स्टोर केलेल्या इमेज डाटाशी तुलना करावी लागेल. लँडिंगच्या जागेवर 30 सेंटीमीटरपेक्षा एखादी मोठी वस्तू असेल, तर त्यात बदल होईल. चांद्रयान-2 ला शेवटच्या मिनिटाला लँडिंग स्पॉट शोधता आला नव्हता. पण चांद्रयान-3 मध्ये ही व्यवस्था आहे. लँडिंगनंतर ऊर्जा निर्मितीसाठी चांद्रयान-3 मध्ये अतिरिक्त सोलार पॅनल्स आहेत. जास्त गतीने यान खाली येऊ शकतं ही शक्यता लक्षात घेऊन, गती 2 मीटर प्रति सेकंदवरुन 3 मीटर प्रति सेकंद करण्यात आली आहे.